शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
2
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
3
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
4
AUS vs IND ODI Series Launch Event: 'जानी दुश्मन'सोबत गप्पा मारल्या; मग ते फोटो काढायला गेले, पण... (VIDEO)
5
पराभवाच्या भीतीमुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव; भाजपाची बोचरी टीका
6
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
7
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' वस्तूंची खरेदी करेल मोठे नुकसान; ऐन दिवाळीत होईल पश्चात्ताप!
8
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ट्रॅव्हिस हेडचं मोठं वक्तव्य, रोहित-विराटबद्दल म्हणाला...
9
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीची एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते खूश; म्हणाले- "अंगावर काटा आला..."
10
'थामा'मध्ये रश्मिका मंदानाचे दमदार अ‍ॅक्शन सीन्स; म्हणाली, "पहिल्यांदाच मी अशा..."
11
टायटन-रिलायन्ससह 'या' स्टॉक्सचा धमाका! निफ्टीने १२ महिन्यांचा विक्रम मोडला, एका दिवसात २% तेजी
12
दिवाळीत आपलं कुटुंब ठेवा सुरक्षित! फक्त ५ रुपयांत ५०,००० चा विमा; या कंपनीने आणला 'फटाका इन्शुरन्स'
13
‘तुम्ही चुकीचे आहात, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरत नाहीत...’; अमेरिकन सिंगरने राहुल गांधींना फटकारले
14
Kolhapur Crime: धक्कादायक! कोल्हापूरमध्ये सहा नृत्यांगनांनी केला सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न
15
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
16
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
17
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
18
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
19
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!

पवना आणि मुळा नदीची पाणी पातळी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 18:54 IST

पवना धरण   ९९.४२ टक्के भरले

पिंपरी:  परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ होत असल्याने नदीकाठच्या रहिवाश्यांना महापालिकेच्या वतीने ध्वनीक्षेपकाद्वारे सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. महापालिकेचे आपत्कालीन पथक अशा भागात प्रत्यक्ष गस्त घालीत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतंत्र पथकाद्वारे नदीकाठच्या भागावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयात मध्यवर्ती तसेच क्षेत्रीय कार्यालयनिहाय २४ तास नियंत्रण कक्ष सज्ज आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे. 

महापालिकेच्या वतीने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुख्य रस्त्यांवर पाणी साचून दळणवळण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो म्हणून क्षेत्रीय कार्यालय निहाय स्वतंत्र पथक तैनात केले आहे. चेंबरमध्ये कचरा अडकून पाणी तुंबू नये यासाठी आरोग्य पथकाची नेमणूक केली आहे. पाणी साचलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी त्या भागात तात्काळ पाणी उपसा यंत्रणा वाहन पाठवून आवश्यक कार्यवाही करावी, तुटलेले चेंबर तात्काळ दुरुस्त करावे, असे  निर्देश आयुक्त यांनी दिले आहेत.   साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी घरोघरी सर्वेक्षण करून आरोग्य तपासणी मोहीम राबविणे, धुरीकरण करणे, पावसामुळे शहरातील महत्वाच्या चौकांच्या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनासमवेत योग्य समन्वय ठेवून आपत्कालीन परिस्थिती हाताळणे, आदी सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या आहेत. धोकादायक  ठिकाणांची पाहणी करून त्या अनुषंगाने संबंधित विभागांमार्फत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु आहे. पूरबाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियोजन केले आहे. स्थलांतरित ठिकाणी आवश्यक सुविधा, भोजन तसेच वैद्यकीय सेवा आदी बाबींचे नियोजन आणि व्यवस्थापन देखील केले आहे. पूर परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची पाहणी करून त्यावर संबंधित विभागामार्फत तातडीने उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती महापालिका आपत्कालीन विभागाचे नियंत्रण अधिकारी अतिरिक्त आयुक्त चंद्रकात इंदलकर यांनी दिली.   पवना धरण   ९९.४२ टक्के भरलेपवना धरण ९९.४२ टक्के भरलेले  असून पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे १४०० क्युसेक्स व धरणाच्या सांडव्यावरून २१६० क्युसेक्स क्षमतेने  नदीपात्रात विसर्ग चालू आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार आज २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता सांडव्याद्वारे होणा-या  विसर्गामध्ये वाढ करून ४२६० क्यूसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सांडव्यावरील विसर्गानंतर नदीपात्रामध्ये एकूण ५६६० क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू झाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे