शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकला गती मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:39 IST

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घेणार राज्य सरकारसोबत बैठक

पिंपरी : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमवेत पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकबाबत आणि अन्य विषयांसंदर्भात बैठक होणार आहे. रखडलेल्या पुणे-लोणावळा लोहमार्गावरील ट्रॅकला आता गती मिळणार आहे. लोणावळा आणि कर्जतमधील घाटक्षेत्रात बोगदा निर्माण करणे, सह्याद्री एक्सप्रेस सुरू करणे, तिला देहूरोड येथे थांबा देणे, पुणे-जोधपूर रेल्वे दररोज सुरू करणे आणि चिंचवड स्टेशनवर थांबा देणे, अशा मागण्या आहेत.

रेल्वेमंत्री वैष्णव यांची खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट घेतली. मावळ मतदारसंघामधील विविध प्रश्नांवर चर्चा केली. पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. पुणे ते लोणावळा या लोकलमधून दररोज एक लाख नागरिक प्रवास करत आहेत. पुणे-लोणावळा लोहमार्गावरील रेल्वेगाड्या दोन ट्रॅकवरून धावत आहेत.

सात वर्षे काम सुरू नाहीया मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी २०१७ मध्ये मान्यता दिली आहे. याबाबतचे सर्वेक्षणही झाले आहे. ट्रॅक उभारण्यासाठी रेल्वे विभागाकडे जमीनही उपलब्ध आहे; परंतु सात वर्षे काम सुरू झालेले नाही. ट्रॅकचे काम झाल्यानंतर लोकल आणि एक्सप्रेसही धावतील. पुणे ते मुंबई असा दररोजचा प्रवास करण्याऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम तत्काळ सुरू करावे, यासंदर्भात राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी, अशीही मागणी झाली.

घाटक्षेत्रात बोगदा निर्माण करापुणे आणि मुंबईदरम्यान दररोज लाखो प्रवासी प्रवास करत आहेत. लोणावळा आणि कर्जतदरम्यान रेल्वेगाडी चालण्यासाठी दोन इंजिनचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे येथे बोगद्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात येथून लांबपल्ल्याच्या, एक्सप्रेस आणि लोकलही धावू शकतील.

कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू कराकोरोना काळात बंद केलेल्या अनेक रेल्वेगाड्या पुन्हा सुरू केल्या. सह्याद्री एक्सप्रेस सुरू करावी, देहूरोड स्थानक येथे थांबा द्यावा, पुणे-जोधपूर या सात दिवसांनी धावणारी रेल्वे दररोज सुरू करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रlonavalaलोणावळाrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी