शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

Pimpri Chinchwad Crime: सीसीटीव्हीत चोर दिसला जागेवर येऊन धरला!

By रोशन मोरे | Updated: September 25, 2023 17:45 IST

ही घटना शनिवारी (दि.२३) बीट्स कंट्रोल ॲण्ड सोल्युशन्स कंपनी, एमआयडीसी भोसरी येथे घडली....

पिंपरी : कंपनीत चोरी करून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांना रंगेहात सुरक्षारक्षकांनी पकडले. त्यातील एक चोरटा सुरक्षारक्षकांच्या हातून निसटला. मात्र, दुसऱ्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना शनिवारी (दि.२३) बीट्स कंट्रोल ॲण्ड सोल्युशन्स कंपनी, एमआयडीसी भोसरी येथे घडली. या प्रकरणी तीर्थराज सीताराम यादव (वय ५०, रा.भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित रवी सुरेश पवार (१९, रा.आदर्शनगर, मोशी) याला अटक केली. तर, संशयित रोहन पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हे फिर्यादी यांच्या कंपनीची भिंतीवरून कंपनीच्या आतमध्ये आते. त्यांनी कंपनीतील पाच हजार रुपये किंमतीचे कंपनीतील साहित्य चोरून ते चालले होते. संशयित चोरी करत असताना सुरक्षारक्षकांच्या केबीनमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एका संशयिताला ताब्यात घेतले. तर, दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. सुरक्षारक्षकांनी संशयिताला पोलिसांच्या स्वाधीन केले. पळून गेलेल्या दुसऱ्या संशयिताचा शोध पोलिस घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक