शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिमणीला दाणे टाकायला गेलेला..., वडिलांची हाक अन् चौथ्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 21:27 IST

शेवाळलेल्या भिंतीवरून घसरला आणि वडिलांच्या डोळ्यादेखत तो खाली पडल्याने वडिलांनी हंबरडा फोडला

वडगाव मावळ:  इमारतीच्या छतावरून घसरून खाली पडलेल्या शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडगाव मावळ येथे बुधवारी ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनव जगदीश कडभने (वय १३, रा. संभाजीनगर, एमआयडीसी रोड, वडगाव), असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. 

जगदीश कडभने हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून ते कामाच्या निमित्ताने वडगाव मावळ येथे आले आहेत. त्यांना दोन मुले आहेत. त्यातील थोरला मुलगा अभिनव याला पक्ष्यांबद्दल विशेष प्रेम होते. त्याच्या सोसायटीमध्ये दररोज एक चिमणी येत असे. चिमणी आली की अभिनव तिला पाहण्यासाठी बाहेर जायचा. बुधवारी सकाळी आवडत्या चिमणीचा खिडकीतून आवाज आला. चिमणी इमारतीच्या छतावर गेल्याचे पाहून अभिनव तिला दाणे टाकण्यासाठी छतावर गेला. छताच्या भिंतीवर बसून तो तिचे निरीक्षण करीत होता. तेवढ्यात शाळेला निघण्याची वेळ झाल्याने वडिलांनी त्याला हाक मारली. त्यामुळे तो निघत असताना शेवाळलेल्या भिंतीवरून तो घसरला आणि इमारतीच्या छतावरून खाली पडला. डोळ्यादेखत मुलगा खाली पडल्याचे वाहून वडिलांनी जोरात हंबरडा फोडला. त्यानंतर आईने फोडलेल्या टाहोने परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले. अभिनव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

स्कूलबसच्या आधी रुग्णवाहिका आली...

अभिनवला रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यावेळी त्याला शाळेत घेऊन जाण्यासाठी स्कूलबस आली. पण रक्ताने माखलेल्या अभिनवला रुग्णवाहिकेतून नेले जात होते. हे दृश्य पाहून त्याचे शालेय मित्र आणि परिसरातील नागरिकांना शोक आवरणे कठीण झाले होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसDeathमृत्यूAccidentअपघातPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल