शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

यमदूत धावतोय..! बेदरकार सिमेंट मिक्सर, डंपर, हायवाचा धुडगूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 14:42 IST

- वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, वाहनचालकांवर लगाम घालण्याची मागणी

- महेश मंगवडे काळेवाडी : काळेवाडी, थेरगाव, रहाटणीमध्ये ठिकठिकाणी गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांना रेडिमिक्स सिमेंट काँक्रीट पुरवण्यासाठी बिल्डर, उद्योजक, स्थानिकांनी जागोजागी आरएमसी प्लांट थाटले आहेत. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक रेडिमिक्स, खडी, क्रश सॅण्ड, डबर घेऊन बेदरकार, सुसाट वाहतूक करणारे सिमेंट मिक्सर, डंपर रस्त्यावरून जणू ‘यमदूतच धावतोय’ असे बेभान धावत असतात.गेल्या तीन-चार वर्षांत या परिसरातील मुख्य रस्त्यांवर धुडगूस घालणाऱ्या या मालवाहू वाहनांनी अनेकांना चिरडले आहे, हायवा, सिमेंट मिक्सर यांसारखी मोठी वाहने अनेकदा वेगाने धावताना अनियंत्रित होतात. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. बेदरकार वाहतूक करणाऱ्या या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचे अभय राहिले नसून पोलिस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.परिसरात सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत अशा वाहनांना प्रवेशबंदी असतानाही ही अवजड वाहने सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. क्षमतेहून अधिक बांधकाम साहित्य भरल्याने हायवामधून रस्त्यावर माती, डस्ट, खडी तसेच सिमेंट मिक्सरमधून काँक्रीट पडलेले पाहायला मिळते. यामुळे रस्त्यांवर लहान-मोठे अपघात होतात.सिमेंट मिक्सरने घेतला बळीनुकताच हिंजवडी आयटी पार्कमध्ये बेभान असलेल्या सिमेंट मिक्सरमुळे दोन निष्पाप विद्यार्थिनींचा बळी गेला होता. अशा बेदरकार वाहनचालकांवर लगाम घालणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अवजड वाहनांना प्रवेशबाबतच्या शहरी भागातील नियमाप्रमाणे या भागात नियमावली करून सध्या तरी चालणार नाही. मात्र, सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही लपून-छपून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाईची मोहीम राबविली जाईल. - बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग गर्दीच्या वेळेस अशा रस्त्यावरून मिक्सर आणि हायवा सारख्या अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. वाहनचालकांची आणि मालकांचीही हिंमत वाढली आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याची नियमबाह्य व मनमानी पद्धतीने वाहतूक करणाऱ्या बेलगाम वाहनचालक व मालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही पोलिसांकडून अपेक्षा आहे. - शरद ठवरे, ग्रामस्थ, रहाटणी वाढते अपघात अन् दुर्लक्ष- अवजड वाहनांवरील बहुतेक चालक अनुभव नसणारे- सर्रास वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याने ताबा सुटतो- रस्त्यावर प्रचंड अतिक्रमणे झाल्याने अपघाताचा धोका वाढतो- वाहनचालक सर्रासपणे मद्यपान करून वाहने चालवितात- क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक- वाहनांचे फिटनेस व विमा नूतनीकरण करण्याकडे मालकांचे दुर्लक्ष

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिका