शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराला प्रेयसी अन् तिच्या मित्राने दगडाने ठेचले; चिखलीतील घटना

By प्रकाश गायकर | Updated: July 8, 2024 16:59 IST

'तू तुझ्या पती व मुलांना सोडून माझ्याजवळ राहण्यास ये', असा तगादा प्रियकर लावत होता

पिंपरी : पतीला सोडून माझ्याजवळ राहण्यासाठी ये, असा तगादा लावल्याने प्रेयसीने मित्रासोबत मिळून प्रियकरावर जीवघेणा हल्ला केला. प्रेयसीच्या मित्राने तिच्या प्रियकराला दगडाने ठेचले. यामध्ये प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. ७) दुपारी दीड वाजताच्या सुमारास वडाचा मळा, जाधववाडी चिखली येथे घडली.

अब्दुलकमाल शेख, असे जखमी प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ हबीब अब्दुला शेख (वय ३६, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुलकमाल याची प्रेयसी (वय ३४, रा. चिखली) आणि तिचा मित्र प्रेमदास विठ्ठल चव्हाण (वय २८, रा. पाटीलनगर, चिखली) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९, ११५ (२), ३५२, ३५१ (३), ३(५) यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुलकमाल याचे संशयित आरोपी महिलेशी प्रेमसंबंध होते. ‘तू तुझ्या पती व मुलांना सोडून माझ्याजवळ राहण्यास ये.’ असा तो तिच्याकडे वारंवार तगादा लावत होता. त्यावरून दोघांमध्ये सतत भांडण होत होते. हा वाद विकोपाला गेल्याने तिने तिच्या मित्राला हा प्रकार सांगितला.

प्रेयसी आणि तिच्या मित्राने अब्दुलकमाल याला लाथाबुक्क्यांनी व दगडाने डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी हबीब शेख, रमजान अली आणि हिरामण रोकडे यांनी आरोपी प्रेमदास याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘तुम्ही मध्ये आलात, तर तुम्हाला पण मारून टाकीन’, अशी त्याने धमकी देत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अब्दुलकमाल याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी प्रेमदास याला अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाChikhliचिखली