स्पेनमधील नागरिकांनी लुटला धुलिवंदन खेळण्याचा आनंद

By विश्वास मोरे | Published: March 25, 2024 07:45 PM2024-03-25T19:45:46+5:302024-03-25T19:46:15+5:30

स्पेनच्या नागरिकांनी सणांचा आनंद लुटण्याबरोबरच त्याबद्दल माहितीही जाणून घेतली

The citizens of Spain were robbed of the joy of playing Dhulivandan | स्पेनमधील नागरिकांनी लुटला धुलिवंदन खेळण्याचा आनंद

स्पेनमधील नागरिकांनी लुटला धुलिवंदन खेळण्याचा आनंद

पिंपरी: भारतीय संस्कृतीतील सणांची मोहिनी परदेशातील नागरिकांना असते. स्पेनमधील नागरिकांनी आकुर्डी मध्ये धुलीवंदन साजरे केले. मराठी सणांचा आनंद लुटला. 

पिंपरी- चिंचवड शहरामध्ये विविध भागांमध्ये होळी आणि धुलीवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. रविवारी रात्री प्रभाग क्रमांक दहा संभाजीनगर एचडीएफसी कॉलनी येथे विदेशी नागरिकांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी  होळी कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.  यावेळी होळीविषयी व भारतीय संस्कृती विषयी कॉलनीचे चेअरमन श्री. वडजे, प्रभागाच्या माजी अध्यक्ष अनुराधा गोरखे, कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी माहिती दिली. 'होळी रे होळी आणि जय श्रीराम...' म्हणत स्पेनच्या नागरिकांनी होळी साजरी केली.

सोसायटीत साजरे झाले धुलीवंदन!

सोमवारी सकाळी साडेदहा वाजता ऐश्वर्यम कम्फर्ट सोसायटी येथे परदेशी पाहुण्यासोबत धूलिवंदन साजरे झाले. यावेळी परदेशी पाहुण्यांनी सोसायटीतील नागरिकांबरोबर रंग खेळले. धुलीवंदनाचा आनंद लुटला.

कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले, ''भारतीय संस्कृती विषयी उत्सुकता अन्य देशातील नागरिकांना आहे स्पेनमधील नागरिक पिंपरी चिंचवड शहरात आले होते त्यांनी ऐश्वर्या सोसायटीमध्ये येऊन नागरिकांबरोबर धुळीवंदनाचा आनंद घेतला. भारतीय संस्कृती जाणून घेतली.''

Web Title: The citizens of Spain were robbed of the joy of playing Dhulivandan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.