शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

धन्य दिन संतदर्शनाचा, अनंत जन्मीचा शीण गेला...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 10:27 IST

भाविकांच्या गर्दीने गजबजलेली अलंकापुरी काही तासांतच सुनी सुनी झाली.

आळंदी: ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या ७२८ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याची छबिना व 'श्रीं'ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. 'ज्ञानोबा माउली तुकाराम' असा जयघोष करत हजारो माउली भक्त नगरप्रदक्षिणा मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर भाविकांच्या गर्दीने गजबजलेली अलंकापुरी काही तासांतच सुनी सुनी झाली.धन्य आज दिन संत दर्शनाचा । अनंत जन्मीचा शीण गेला ॥ मज वाटे त्यांशी आलिंगन द्यावे। कदा न सोडावे चरण त्यांचे ॥गेल्या आठ दिवसांपासून अलंकापुरीत माउलींचा संजीवन सोहळा भक्तिमय वातावरणात सुरु होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून माउलींचा संजीवन सोहळा तसेच कार्तिकी वारी प्रत्यक्ष स्वतःच्या नयनांनी अनुभवण्यासाठी सुमारे तीन ते साडेतीन लाख भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली होती. गुरुवारी (दि. २८) माउलींचा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.तत्पूर्वी  आज पहाटे तीनच्या सुमारास माउलींची आरती, महापूजा करण्यात आली. दुधारती घेऊन आजच्या सांगता दिवसाला प्रारंभ करण्यात आला. दर्शनबारीतून भाविकांना 'श्रीं'च्या दर्शनासाठी सोडण्यात आले. दुपारी बाराच्या दरम्यान माउलींना महानैवेद्य दाखविण्यात आला. रात्री आठ वाजता धूपारती घेऊन शेजारती घेऊन आठदिवसीय सोहळ्याची विधिवत सांगता करण्यात आली. सोहळा सांगतेच्या मुख्य कार्यक्रमाला साडेनऊच्या सुमारास सुरुवात करण्यात आली. 'श्रीं'ची विधिवत महापूजा करून मानकऱ्यांच्या साह्याने "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय" असा जयघोष करून माउलींना पंखा मंडपातून, करंज्या मंडप, वीणा मंडपात घेऊन आणण्यात आले.मंदिराच्या मुख्य महाद्वारातून श्रींचा छबिना सजविलेल्या पालखीतून नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. त्यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

शनिमंदिरापासून फुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, भैराबा चौकमार्गे निघालेला हा छबिना हजेरी मारुतीजवळ येऊन काही वेळापुरता विसावला. विसावा घेऊन पुन्हा सोहळा पुढे मार्गस्थ झाला. नगरपरिषद चौकमार्गे आजोळ घरासमोरून विष्णू मंदिराशेजारून इंद्रायणी घाटाकडून रात्री साडेबाराच्या सुमारास पालखी सोहळा मंदिराच्या महाद्वाराजवळ पोहचला. वीणामंडपात आरती घेऊन माउलींच्या पादुकांना शेजघरामध्ये स्थापन करून सोहळ्याची विधिवत सांगता करण्यात आली.दर्शनासाठी गर्दीमंदिराच्या मुख्य महाद्वारातून श्रींचा छबिना सजविलेल्या पालखीतून नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. त्यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदीPuneपुणेvarkariवारकरीdehuदेहू