अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 18:04 IST2019-09-14T18:02:14+5:302019-09-14T18:04:56+5:30
अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने आलेल्या नैराश्यातून दहावीच्या विद्यार्थिनीने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रहाटणी येथे शुक्रवारी (दि. १३) सकाळी घडली.

अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
हिंजवडी : अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने आलेल्या नैराश्यातून दहावीच्या विद्यार्थिनीने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रहाटणी येथे शुक्रवारी (दि. १३) सकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना नारायण ऊर्फ प्रताप पाटील (वय १५, रा. वाघोली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. कल्पना बीजीएस महविद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. कल्पना काही दिवसांकरता रहाटणी येथील आपल्या बहिणीकडे रहाण्यासाठी आली होती. शुक्रवारी सकाळी बहीण आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर घरात इतर कोणी नसताना कल्पनाने घरातील छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.
काही वेळाने हा प्रकार बहिणीच्या लक्षात येताच उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान दहावीचा अभ्याक्रम अवघड जात असल्याने काही दिवसांपासून तिला नैराश्य आले होते, असे तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. या संबंधी वाकड पोलीस अधिक तपास करत आहे.