वाकड पुलाच्या कठड्याला बसची धडक : दहा प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 16:23 IST2018-07-08T16:22:52+5:302018-07-08T16:23:02+5:30
कोल्हापूरच्या दिशेने निघालेली खासगी बस वाकड येथील मुळा नदीच्या पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने बस कठड्याला धडकली.रस्त्यावर पलटी होऊन झालेल्या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहेत.

वाकड पुलाच्या कठड्याला बसची धडक : दहा प्रवासी जखमी
पिंपरी : कोल्हापूरच्या दिशेने निघालेली खासगी बस वाकड येथील मुळा नदीच्या पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने बस कठड्याला धडकली.रस्त्यावर पलटी होऊन झालेल्या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी पहाटे चारच्या सुमारास वाकड येथे घडला.पुलाच्या कठड्याला बस अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. या बसमध्ये एकूण ३० प्रवाशी होते.
यामध्ये बेलापूर न्यायालयाच्या न्यायाधिश चंद्राशिला पाटील आणि त्यांची पाच वर्षाची मुलगी स्वरा पाटील या मायलेकी गंभीर जखमी झाल्या आहेत.बोरीवली ते कोल्हापूर अशी एम बी लिंक ट्रँव्हसची बस (एम एच ०९ सी व्ही ३६९७) कोल्हापूरच्या दिशेने जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. अधिक वाकड पोलिस तपास करत आहेत.