वाकड येथे आगीत रद्दीचा टेम्पो जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 14:46 IST2018-05-26T14:46:47+5:302018-05-26T14:46:47+5:30

टेम्पो रद्दीने भरला असल्याने आग आटोक्यात येत नव्हती.

tempo was burnt in fire At the Wakad | वाकड येथे आगीत रद्दीचा टेम्पो जळून खाक 

वाकड येथे आगीत रद्दीचा टेम्पो जळून खाक 

पिंपरी : वाकड येथे उभ्या असलेल्या रद्दीच्या टेम्पोला आग लागून त्यात हे वाहन जळून पूर्णपणे खाक झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड मधील साई चौकात उभ्या असलेल्या रद्दीच्या टेम्पोला (एमएच-१४ -सीडी-७३३२) आग लागल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यांनी या घटनेबाबत अग्निशामक दलास माहिती दिली. अग्निशामक मुख्यालयातून संत तुकाराम नगर तसेच रहाटणी येथून प्रत्येकी अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. टेम्पो रद्दीने भरला असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी टेम्पोतील रद्दी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अर्धा तासानंतर आगीवर नियंत्रण आले. मात्र, तोपर्यंत टेम्पो जळून खाक झाला होता. 
टेम्पोवर दोन मोबाईल क्रमांकही लिहिले होते. या क्रमांकावर पोलीस आणि अग्निशामक दलाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. टेम्पो विषयी अधिकची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांद्वारे कळविण्यात आले आहे. 

Web Title: tempo was burnt in fire At the Wakad