Pune | पैसे मागितल्याने टपरीचालकावर काेयत्याने वार; पिंपळे गुरवमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 13:59 IST2022-12-29T13:58:50+5:302022-12-29T13:59:26+5:30
पिंपरी : पैसे मागितल्याने पानटपरी चालकावर कोयत्याने सपासप वार केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. खुनी हल्ल्याचा ...

Pune | पैसे मागितल्याने टपरीचालकावर काेयत्याने वार; पिंपळे गुरवमधील घटना
पिंपरी : पैसे मागितल्याने पानटपरी चालकावर कोयत्याने सपासप वार केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. खुनी हल्ल्याचा हा प्रकार मंगळवारी (दि. २७) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडला.
यश उर्फ सनी किशोर वाघमारे (वय २२, रा. जयमालानगर, जुनी सांगवी), विशाल अशोक फडके (रवय १९, रा. समर्थनगर, नवी सांगवी), अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. राहुल रामलखन यादव (वय १९, रा. पिंपळे गुरव, मूळ रा. उत्तरप्रदेश) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २८) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पानटपरी चालक आहेत. त्यांच्याकडून आरोपींनी गुटखा घेतला होता. फिर्यादीने आरोपींकडे गुटख्याचे पैसे मागितले. या कारणावरून आरोपींना राग आला. तू आम्हाला नेहमी पैसे मागतो. तुला खूप माज आला आहे. तुला आज जिवंत ठेवत नाही, असे म्हणून आरोपींनी धारदार कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर व डाव्या हातावर सपासप वार करून फिर्यादीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवीगाळ करून आरोपी कोयते घेऊन त्यांच्या गाडीवरून पळून गेले, असे फिर्यादीत नमूद आहे.