मुलीशी बोलल्याने एकाला मारहाण, कोयत्याने वार अन् डोक्यात बिअरची बाटलीही फोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 23:49 IST2018-12-19T23:47:58+5:302018-12-19T23:49:17+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल भोसले, अजय सावंत, शुभम कांबळे या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talking to the girl, a man beat up | मुलीशी बोलल्याने एकाला मारहाण, कोयत्याने वार अन् डोक्यात बिअरची बाटलीही फोडली

मुलीशी बोलल्याने एकाला मारहाण, कोयत्याने वार अन् डोक्यात बिअरची बाटलीही फोडली

पिंपरी : मित्र, मैत्रिणी गप्पा मारत थांबलेले असताना, मुलीशी का बोलला याचा जाब विचारत आरोपींनी तरुणाला मारहाण केली. कोयत्याने हातावर वार, डोक्यात बियरची बाटली फोडून त्यास जखमी केले. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली. याप्रकरणी महेश सुभाष जाधव (वय १९, रा. गणेशनगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल भोसले, अजय सावंत, शुभम कांबळे या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा मित्र आदेश, तसेच एक मुलगी, किरण असे तिघे जण गप्पा मारत थांबले होते. अमोल भोसले व शुभम कांबळे यांच्या हातात लोखंडी कोयते होते. अजय सावंत याच्या हातात बियरची रिकामी बाटली होती. मुलीशी बोलल्याच्या कारणावरून अमोल भोसले याने हातातील कोयत्याने फिर्यादीच्या हातावर तसेच खांद्यावर वार केले. अजय सावंत याने बियरची बाटली आदेशच्या डोक्यात मारली.

Web Title: Talking to the girl, a man beat up