तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक, भोसरी एमआयडीसी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 15:13 IST2024-01-15T15:12:47+5:302024-01-15T15:13:17+5:30
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही कारवाई केली....

तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक, भोसरी एमआयडीसी पोलिसांची कारवाई
पिंपरी : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक केली. एमआयडीसी भोसरीपोलिसांनी रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही कारवाई केली. करण कुमार जाधव (२६, रा. लक्ष्मीनगर, मोशी) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलिस परिसरात गस्त घालत असताना हवालदार वस्ती मोशी येथे तडीपार केलेला गुंड शस्त्रासह आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित रिक्षाचा पाठलाग केला.
पोलिस मागावर असल्याचे लक्षात येताच रिक्षातील दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यातील एकास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या करण जाधवकडे चौकशी केली असता त्याला पिंपरी - चिंचवड पोलिसांनी तडीपार केले असल्याचे निष्पन्न झाले. तो पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. त्याच्यावर भोसरी, एमआयडीसी भोसरी, निगडी, विश्रांतवाडी, चाकण, पिंपरी पोलिस ठाण्यात २० गुन्ह्यांची नोंद आहे.