थेरगावात महिलेचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:06 IST2018-05-14T14:06:42+5:302018-05-14T14:06:42+5:30

प्रिया ही अविवाहित असून या घरात हे दोघे बहीण भाऊच राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे आई वडील मरण पावले आहेत तर प्रिया बजाज अलियान्झ मध्ये नोकरी करीत होती.

The suspicious death of a woman in Thergaon near Pimpri Chinchavad | थेरगावात महिलेचा संशयास्पद मृत्यू

थेरगावात महिलेचा संशयास्पद मृत्यू

ठळक मुद्दे मृत प्रिया ही भाऊ किरणसह थेरगाव येथे राहत होती. मृत्यू नेमका कशाने झाला हे शव विच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होणार

पिंपरी-चिंचवड (वाकड) : थेरगाव येथील जय मल्हार कॉलनी गल्ली क्रमांक ५ येथील महिला राहत्या घरात संशयास्‍पदरित्या मृतावस्‍थेत आढळली.       प्रिया रोहिदास सुतार (वय ३७) असे त्या महिलेचे नाव आहे रविवारी (दि १३) सकाळी ९ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मात्र तीचा नैसर्गिक मृत्यू का आत्महत्या की अजून काही हे स्पष्ट नसून याबाबत वाकड पोलिस तपास करीत आहेत. 

      मृत प्रिया ही भाऊ किरणसह थेरगाव येथे राहत होती. सकाळी किरण याने शेजार्‍यांना प्रियाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वाकड पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्‍छेदनासाठी मृतदेह रुग्‍णालयात पाठविण्यात आला आहे. प्रिया ही अविवाहित असून या घरात हे दोघे बहीण भाऊच राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे आई वडील मरण पावले आहेत तर प्रिया बजाज अलियान्झ मध्ये नोकरी करीत होती.  गेल्या दोन वर्षांपूर्वी तीला किडनीचा आजार बाळावल्याने  तिने किडनी ट्रान्सप्लांट करून घेतली होती. यानंतरही ती नेहमी आजारीच असायची त्यामुळे दोन वर्षांपासून नोकरी सोडून ती घरीच होती प्रियाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे शव विच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

Web Title: The suspicious death of a woman in Thergaon near Pimpri Chinchavad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.