शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

पिंपरी महापालिका क्षेत्रातील मिळकतींचे सर्वेक्षण करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 2:44 PM

महापालिका क्षेत्रातील नोंदणी न केलेल्या आणि वाढीव अधिकृत व अनधिकृत बांधकामांचे, मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

ठळक मुद्देनागरिकांना स्वयं घोषणापत्र यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिला जाणार दावे निकाली काढून करवसूली वाढविण्यावर भर राहणार

पिंपरी : महापालिका क्षेत्रातील नोंदणी न केलेल्या आणि वाढीव अधिकृत व अनधिकृत बांधकामांचे, मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार असून येत्या पंधरा दिवसात स्वयं घोषणापत्र देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे, पंधरा दिवसानंतर नोंदणी नसलेल्या मिळकतींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, टॅक्स बुडविणाऱ्यांचा शोध घेणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी असताना त्यांनी नोंदणी न झालेल्या मिळकतींचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार ८० हजार नवीन मिळकती सापडल्या होत्या. त्यानंतर काही वर्षांत मिळकतींचे सर्वेक्षण झाले नाही. दरम्यान आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाणी पट्टी आणि मिळकत करवाढ करू नये, या मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले आहे. कर वाढ करण्याऐवजी नोंद न झालेल्या मिळकतींचे सर्वेक्षण करावे, नोंदणी करावी, त्यातून मिळकत कर विभागाचे उत्पन्न वाढवावे, अशी सूचना केली आहे. त्यानुसार आयुक्तांनी आज माध्यमांना करवाढीविषयीची भूमिका विशद केली. आयुक्त हर्डीकर म्हणाले, ह्यह्यटप्या टप्याने करवाढ करावी, अशी प्रशासनाची सूचना असते. करवाढ प्रस्तावित असली तरी याबाबतचा निर्णय सर्वसाधारण सभा घेईल. मिळकतींचे सर्वेक्षण २०१२ मध्ये करण्यात आले होते. त्यामध्ये नोंदणी नसलेल्या मिळकती सापडल्या होत्या. त्यांची नोंदणी करून मिळकत कर प्रणालीत त्यांना आणले आहे.याच धर्तीवर महापालिका क्षेत्रातील मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे.   टॅक्स बुडविणाऱ्यांचा शोध घेणार आहे. मिळकत बांधली पंरतू पूर्णपणे नोंद केली नाही. तसेच अर्धवट नोंदणी केली. अशा अधिकृत आणि अनधिकृत दोन्ही प्रकारातील मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच निवासी बांधकाम परंतु त्याचा वापर व्यावसायिक केला जात असेल, अशाही मिळकती शोधणार आहेत. नागरिकांना स्वयं घोषणापत्र यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिला जाणार असून त्यानंतर महापालिकेच्या पथकांच्या वतीने शोध घेतला जाणार आहे, असेही आयुक्त म्हणाले.मिळकत कर न भरणाऱ्यांना नोंटीसा दिल्या आहेत. तसेच कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत, तसेच मिळकत कर वसूली पथकांना हवे ते मनुष्यबळ दिले जाणार आहे, तसेच मोठ्या प्रमाणावर थकबाकी असणारी आणि न्यायप्रविष्ट प्रकरणांबाबत वकिलांच्या पॅनेलशी चर्चा केली आहे, दावे निकाली काढून करवसूली वाढविण्यावर भर राहणार आहे, असेही हर्डीकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेTaxकर