देहूगाव शहर शिवसेना प्रमुखपदी सुनील हगवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 04:33 IST2018-04-19T04:33:10+5:302018-04-19T04:33:10+5:30
श्रीक्षेत्र देहूगाव हे मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे गाव आहे. हगवणे यांनी नियुक्ती झाल्याचे समजताच येथील कार्यकर्त्यांनी गावात मोठा जल्लोष केला

देहूगाव शहर शिवसेना प्रमुखपदी सुनील हगवणे
देहूगाव : येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील हगवणे यांची देहूगाव शहर प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. त्यांची ही निवड शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना कार्यालयातून जाहीर केली आहे.
श्रीक्षेत्र देहूगाव हे मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे गाव आहे. हगवणे यांनी नियुक्ती झाल्याचे समजताच येथील कार्यकर्त्यांनी गावात मोठा जल्लोष केला आणि तातडीची बैठक घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. या वेळी देहूगावचे माजी उपतालुका प्रमुख रमेश हगवणे, माजी उपसरपंच प्रशांत भालेकर, लक्ष्मण कंद, माजी विश्वस्त संजयमहाराज मोरे, ग्रामपंचायत सदस्या शैला खंडागळे, शुभांगी काळंगे, सुनंदा ढमाले, भाग्यश्री यादव, संजय आहेरकर, सुनील धुमाळ, विजय हगवणे, गणेश मोरे, विजय निम्हण, प्रशांत सुतार, निखिल मराठे, गणेश हगवणे, सुहास मराठे, शेखर शेलार, सागर हगवणे, सचिन हगवणे, अर्झुन मोरे, राहुल हगवणे, सोमनाथ परंडवाल, नवनाथ विधाटे आदी उपस्थित होते.