चिंचवड येथे गळफास घेऊन आत्महत्या : कारण स्पष्ट नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 14:05 IST2018-08-30T14:04:30+5:302018-08-30T14:05:13+5:30
चिंचवड येथील बिजलीनगर येथे बुधवारी रात्री 10 च्या सुमारास राहत्या घरामध्ये गळफास घेत 41 वर्षीय व्यक्तीने केली.

चिंचवड येथे गळफास घेऊन आत्महत्या : कारण स्पष्ट नाही
रावेत : चिंचवड येथील बिजलीनगर येथे बुधवारी रात्री 10 च्या सुमारास राहत्या घरामध्ये गळफास घेत 41 वर्षीय व्यक्तीने केली. उमेश महादेव शिंदे (वय ४१, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे .आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांची पत्नी मुले घराबाहेर थांबली होती. त्यावेळी शिंदे यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. ही बाब त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्वरीत वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.उमेश शिंदे हे गेल्या अनेक महिन्यांपासून बेरोजगार होते. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.