किवळे येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 18:00 IST2018-11-28T17:58:53+5:302018-11-28T18:00:02+5:30
संबंधित महिलेने राहत्या घरी घराच्या सिलींग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला.

किवळे येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
किवळे : विकासनगर (किवळे) येथे एका महिलेने तिच्या राहत्या घरी सिलींग पंख्याला ओढणीच्या साहयाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे.राधिका रामबच्चन विश्वकर्मा ( वय ५८ रा. मीना कॉलनी, विकासनगर, किवळे) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने राहत्या घरी बुधवारी सकाळी उठल्यानंतर साडेसातच्या सुमारास घराच्या सिलींग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. त्यांचे पती सकाळी साफसफाई करत असताना त्यांना त्यांच्या पत्नीने गळफास घेतल्याचे दिसले. याबाबत देहूुरोड पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलीस आल्यानंतर त्यांनी संबंधित मृत महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविला आहे. संबंधित महिला मानसिक रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु होते , असे सांगण्यात आले आहे.यापूर्वी त्यांनी मला जगायचे नाही असे म्हणत आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे समजते. मात्र आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास देहूरोड पोलिस करीत आहेत.