शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

Pimpri Chinchwad: 'मी खूप त्रासलो आहे', सासरच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 19:09 IST

पत्नी, सासू, मेव्हणा, मेव्हणी आणि तिच्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद

पिंपरी : सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली. सुतारवस्ती माण हिंजवडी येथे ऑक्टोबर २०२१ पासून ८ जानेवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडली. गणेश नागनाथ चव्हाण, असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. 

गणेशचे वडील नागनाथ भाऊराव चव्हाण (वय ५०, रा. निचपूर, ता. किनवट, जि. नांदेड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २३) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, रोशनी गणेश चव्हाण (वय २४,) वनिता मोहन पवार (वय ४५, रा. पालाईगुडा, पो. गोंडवडसा, ता. माहुर, जि. नांदेड), रुपाली आलोक राठोड (वय २०, रा. मुंबई), आलोक दशरथ राठोड (वय २८, रा. मुंबई), रितेश मोहन पवार (वय १९, रा. पालाईगुडा, पो. गोंडवडसा, ता. माहुर, जि. नांदेड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा गणेश याचा आणि आरोपी रोशनी हिचा २०१३ मध्ये विवाह झाला. गणेश आणि रोशनी त्यांच्या दोन मुलांसह सुतारवस्ती, माण, हिंजवडी येथे राहत होते. गणेश पुणे येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. रोशनीची आई वनिता पवार हिने गणेशकडून एक लाख ३० हजार रुपये घेतले होते. गणेश याने ते पैसे परत मागितले असता तिने रोशनीला गणेशच्या विरोधात भडकावले. त्यामुळे रोशनीने गणेश सोबत भांडण केले. रोशनी दोन्ही मुलांना घेऊन मुंबईला तिची आई आणि बहीण यांच्याकडे निघून गेली. आरोपींनी रोशनी आणि तिच्या मुलांना गणेशपासून लपवून ठेवले. दोन्ही मुलांना गणेश सोबत बोलू दिले नाही.  

नातेवाईकांच्या ताब्यात दिला नाही मृतदेह

गणेशचा मृतदेह शविच्छेदनासाठी नेला असता कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यामुळे गणेशचा मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला नाही.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

गणेशने ८ जानेवारी २०२२ रोजी त्याचा भाऊ दिनेशला फोन केला. मी खूप त्रासलो आहे. मला त्रास सहन होत नाही. तुझ्याशी माझं शेवटचं बोलणं आहे, असे गणेशने दिनेशला सांगितले. त्यानंतर दिनेशने त्याच्या मित्राला गणेशच्या घरी पाठवले. मित्र गणेशच्या घरी गेला. मात्र तोपर्यंत गणेशने गळफास घेतला होता. गणेशने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. पत्नी, सासू, मेव्हणा, मेव्हणी आणि तिच्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस