हिंजवडीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 15:48 IST2018-05-12T15:48:45+5:302018-05-12T15:48:45+5:30
हिंजवडी येथील अायटी पार्क येथे काम करणाऱ्या अनिल कांबळे या तरुणाने अात्महत्या केली अाहे. त्याच्या अात्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट हाेऊ शकले नाही.

हिंजवडीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
पिंपरी-चिंचवड (वाकड) : हिंजवडी येथील एका कंपनीत काम करणाऱ्या अभियंताचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, हिंजवडी आयटी पार्क मध्ये नोकरी करणाऱ्या तरुणाने हिंजवडी फेज दोन येथील डोंगरावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला अाहे. या दाेन्ही घटनांमुळे अायटी पार्कमधील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण अाहे.
अनिल प्रल्हाद कांबळे (वय २४, रा बोडके वस्ती, माण) असे त्या तरुणाचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अनिल हा सुमित फॅसिलिटी मॅनेजमेंट या कॉन्ट्रॅक्टमध्ये नोकरी करीत होता त्याने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्याचा अंदाज असून आत्महत्येमागील नेमके कारण समजु शकले नाही, हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.