Pune: गॅसची चोरी करण्याचा प्रयत्न करताना रोखले, पोलिसांशी झटापट; एकाला अटक
By नारायण बडगुजर | Updated: August 12, 2023 15:23 IST2023-08-12T15:23:28+5:302023-08-12T15:23:44+5:30
रावेत येथे गुरुवारी (दि. १०) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला..

Pune: गॅसची चोरी करण्याचा प्रयत्न करताना रोखले, पोलिसांशी झटापट; एकाला अटक
पिंपरी : अंगावर धावत येऊन पोलिसांशी झटापट केली. तसेच गॅस टाक्यांमधून गॅसची चोरी करण्याचा प्रयत्न करताना मिळून आला. गणेशनगर, रावेत येथे गुरुवारी (दि. १०) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.
विकास किसना राम बिश्नोई (वय २२, रा. भगवतीनगर, सूसगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस कर्मचारी नवीन चव्हाण यांनी याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डायल ११२ या हेल्पलाइन मार्शल ड्युटीवर असताना राजलक्ष्मी सोसायटी गणेशनगर, रावेत येथून काॅल आला. त्यानुसार फिर्यादी नवीन चव्हाण आणि पोलिस कर्मचारी बेंडभर हे गणेशनगर येथे गेले. त्यावेळी आरोपी हा फिर्यादी चव्हाण आणि बेंडभर यांच्या अंधावर धावून गेला. तसेच पोलिसांशी झटापट करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच गॅस टाक्यांमधील गॅसची चोरी करण्याचा प्रयत्न करताना आरोपी मिळून आला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक रवी पन्हाळे तपास करीत आहेत.