शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

Corona virus : कोरोनाबाधितांवर उपचार करताना रेमडेसिविरचा अवाजवी वापर थांबवा : डॉ. अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 10:10 PM

आरोग्य रक्षणाची जबाबदारी आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि सरकार यांची जेवढी आहे तेवढीच जबाबदारी प्रत्येकाची देखील आहे....

पिंपरी: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचा आलेख गेल्या काही दिवसांपासून स्थिरावला आहे  ही दिलासादायक गोष्ट आहे.  मात्र तरीदेखील कोणीही गाफील न राहता कोरोना संबंधित नियमांचे काटेकोर पालन करुन स्वत:सह कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, कोरोना बाधितांवर उपचार करताना रेमडेसिविरचा अवाजवी वापर थांबवणे गरजेचे आहे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पिंपरी येथील जम्बो कोविड सेंटरला तसेच ऑटो क्लस्टर, चिंचवड येथील कोविड रुग्णालयाला खासदार डॉ. कोल्हे यांनी भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा आणि माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त सुनिल अलमलेकर, बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, जम्बो कोवीड रुग्णालयाचे समन्वयक डॉ. सुनिल पवार, व्यवस्थापक डॉ. संग्राम कपाले, प्रिती व्हिक्टर आदी उपस्थित होते.   खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘‘कोविड सदृश लक्षणे दिसत असतील अथवा बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यास तात्काळ कोरोनाची चाचणी करुन निदान करणे गरजेचे आहे.त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यानंतर कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. आरोग्य रक्षणाची जबाबदारी आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि सरकार यांची जेवढी आहे तेवढीच जबाबदारी प्रत्येकाची देखील आहे.  कोरोना बाधितांवर उपचार करताना रेमडेसिविरचा अवाजवी वापर थांबवणे गरजेचे आहे.ज्या रुग्णांना त्याची आवश्यकता आहे अशा योग्य रुग्णांना रेमडेसिविर दिले पाहिजे.  

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रेमडेसीवीरची वितरण प्रणाली योग्य पध्दतीने कार्यरत आहे.  रेमडेसिविर कशा पध्दतीने उपलब्ध होते याची माहिती करुन दिल्यास नागरिकांची धावपळ होणार नाही.  महापालिकेने येथील व्यवस्थापनाचे उत्तम पध्दतीने नियोजन केले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचे समूपदेशन करुन त्यांना दिलासा देण्याचे काम देखील महापालिका करीत आहे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेremdesivirरेमडेसिवीर