पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीत सायकल शेरिंग सेवेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 05:24 PM2017-11-25T17:24:33+5:302017-11-25T17:27:41+5:30

पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटी व झुमकार कंपनीच्या माध्यमातून सायकल शेरिंग सेवा पीईडीएल सुरु करण्यात आली. या सेवेचे उद्घाटन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले. 

Starting the cycle sharing service in the Roseland Society of Pimpale Saudagar | पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीत सायकल शेरिंग सेवेला सुरूवात

पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीत सायकल शेरिंग सेवेला सुरूवात

Next
ठळक मुद्देनगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले सायकल शेरिंग सेवेचे उद्घाटनपिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीच्या सायकल थांब्यावर ठेवण्यात आल्या ५० सायकल

रहाटणी : शहरातील रस्त्यावर वाहनांची संख्या कमी व्हावी, त्याचबरोबर वाहतूक कोंडीला आला बसावा व आरोग्य चांगले यासाठी पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटी व झुमकार कंपनीच्या माध्यमातून सायकल शेरिंग सेवा पीईडीएल सुरु करण्यात आली. या सेवेचे उद्घाटन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी रोझलँड सोसायटी चेअरमन संतोष म्हसकर, सेक्रेटरी आनंदजी दफ्तरदार, जॉइंट सेक्रेटरी चंदन चौरसिया, खजिनदार सिद्धार्थ नाईक, बाबासाहेब साठे, अभय कुलकर्णी, मिथुन गोडबोले यांच्यासह सोसायटी सभासद उपस्थित होते. 
सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्याकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळच नसतो. त्याच बरोबर सध्या प्रत्येक व्यक्तीस एक वाहन ही संकल्पना माणसाच्या मनात रुजली आहे. त्यामुळे वातावरणातील वायू प्रदूषण मोठ्या वाढले आहे. त्यामुळे आबालवृद्धांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी व सध्या मोठ्या प्रमाणात वाहनांच्या प्रदूषणामुळे निर्माण होणा?्या पर्यावरण विषयक समस्या वर पर्याय म्हणून रोझलँड सोसायटी व झुमकार कंपनी भाडे तत्वावर सायकल शेरिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. 
वातावरणात प्रदूषणाचे वाढते प्रमाण ही एक चिंतेची बाब आहे. याला नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. तसेच ही सेवा www.pedi. in या वेबसाइडवर उपलब्ध असणार आहे. या सायकलला बारकोड आहे. एखाद्या व्यक्तीने हा बारकोड स्कॅन केल्यानंतरच लॉक उघडणार आहे. या सायकलचे लॉक सोलर उर्जेवर आहे. सदरील वेबसाइडवर गेल्यावर कोणत्या सायकल थांब्यावर किती सायंकाळी उपलब्ध आहेत याची माहिती मिळते व तिथील  सायकलवरील  बारकोड सर्च करून ताब्यात घेता येते, या सायकलचे भाडे आपण आॅनलाईन पद्धतीने भरू शकतो तशी झुमकार कंपनीने सुविधा केली आहे.
सध्या पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीच्या सायकल थांब्यावर ५० सायकल ठेवण्यात आल्या आहेत. रोझलँड सोसायटीच्या पर्यावरणपूरक अशा या संकल्पनेची प्रशंसा करत नगरसेवक बापू काटे यांनी रोझलँड सोसायटी चेअरमन, कमिटी मेंबर्स यांचे अभिनंदन करत सोसायटीच्या अशा या उपक्रमांना नेहमी आपला पाठिंबा असेल तसेच महानगर पालिकेमार्फत आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे काटे यांनी सांगितले. तसेच परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि प्रदूषण मुक्त पर्यावरण करीत आपली मोलाची साथ द्यावी, असे आवाहन काटे यांनी केले आहे. 
शनिवारी सकाळी या सायकलींची रॅली काढण्यात आली. ही रॅली रोझलँड सोसायटीपासून सुरु झाली ती पुढे शिवार चौक, कोकणे चौक, गोविंद यशदा चौक, कुणाल आयकॉन रस्ता मार्गे पुन्हा रोझलँड सोसायटीत आली. यात अनेकांनी सहभाग घेतला.   
 सध्या रोझलँड सोसायटीला सायकल थांब्यावरील सायकलींचे भाडे परिसरातील नागरिकांना अर्धा तास करीता १ रु भाड्याने उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे सकाळ व सायंकाळी लहान मुलांसह तरुण, तरुणी, महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात या सायकलवरून फिरताना दिसत आहेत.  

Web Title: Starting the cycle sharing service in the Roseland Society of Pimpale Saudagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.