stab to one for not giving Chinese manchuriyan to eat | चायनीज मंच्युरियन खायला न दिल्याने चाकूने वार
चायनीज मंच्युरियन खायला न दिल्याने चाकूने वार

पिंपरी : चायनीज मंच्युरियनच्या गाडीवर विक्रेत्याने एकाला चायनीज मंच्युरियन खायला न दिल्याने तरुणावर चाकूने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. मोरवाडी येथील अजमेरा गार्डन येथे मंगळवारी (दि. ११) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामाल मोर्तुज शेख (वय १८, रा. नाणेकर चाळ, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी फिर्याद दिली. याप्रकरणी केशव सतीश पवार (रा. लालटोपीनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख याचा अजमेरा गार्डनसमोर चायनीज मंच्युरियनची गाडी आहे. मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास केशव शेख याच्या गाडीवर चायनीज खाण्यासाठी आला. केशव याला शेख याने चायनीज मंच्युरियन खायला दिले नाही. या रागातून केशव याने त्याच्या हातातील चाकूने शेख याच्या गालावर वार केले. यामध्ये शेख गंभीर जखमी झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.


Web Title: stab to one for not giving Chinese manchuriyan to eat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.