स्पेन दौऱ्यावरील उधळपट्टीचे सत्ताधारी-विरोधकांकडून समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:01 IST2018-12-01T01:01:41+5:302018-12-01T01:01:55+5:30

श्रावण हर्डीकर : चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी करून शहर करणार स्मार्ट

Spanish tourism extortionist-backed supporters | स्पेन दौऱ्यावरील उधळपट्टीचे सत्ताधारी-विरोधकांकडून समर्थन

स्पेन दौऱ्यावरील उधळपट्टीचे सत्ताधारी-विरोधकांकडून समर्थन

पिंपरी : स्मार्ट सिटीच्या बार्सिलोना दौºयावर उधळपट्टी केल्याचे महापालिका सत्ताधारी आणि विरोधकांनी समर्थन केले आहे. शहर विकासासाठी दौरे आवश्यक आहेत, अशी भूमिका पदाधिका-यांनी घेतली आहे. ‘बार्सिलोना दौºयातून नागरिकांच्या साह्याने शहराचे सुयोग्य नियोजन, सक्षम वाहतूकसेवा, मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. विकास आराखड्याच्या भविष्यातील नियोजनात त्याचा उपयोग केला जाणार असल्याचे या वेळी सांगितले. ‘दौºयातील चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी करून शहर स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.


स्पेनमधील बार्सिलोना येथे स्मार्ट सिटी काँग्रेसचे आयोजन केले होते. त्यासाठी स्मार्ट सिटीचे महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, सदस्य प्रमोद कुटे, सचिन चिखले, उपकार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता राजन पाटील आदी सहभागी झाले होते, तर आमदार लक्ष्मण जगताप स्वखर्चाने या दौºयात सहभागी झाले होते. या दौºयात बांधकाम व्यावसायिकही सहभागी झाले होते. त्यामुळे स्पेन दौरा, त्यावरील खर्च, आयुक्तांचा सेल्फी यावर जोरदार टीका झाली होती. काँग्रेसने अहवाल सादर करण्याचे आव्हान सत्ताधाºयांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद झाली. महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार व विरोधी पक्षनेते दत्ता साने उपस्थित होते.

दहा दिवसांच्या युरोप दौºयासाठी दीड लाख खर्च येतो. स्पेन दौºयासाठी एका व्यक्तीला तीन ते साडेतीन लाख खर्च आला आहे, ही उधळपट्टी आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. त्यावर प्रशासनाच्या वतीने आयुक्त म्हणाले, ‘‘स्पेन दौºयाची परवानगी शासनाकडून मिळाली आहे. अभ्यास दौरे हे आकस्मिक किंवा प्रासंगिक असतात. त्यामुळे अन्य कामांसाठी करण्यात येणारी निविदा प्रक्रिया या ठिकाणी राबविली जात नाही. दौºयासाठी असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल.’’

Web Title: Spanish tourism extortionist-backed supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.