महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा सैन्यदलात लेफ्टनंट

By विश्वास मोरे | Updated: January 6, 2025 17:42 IST2025-01-06T17:42:12+5:302025-01-06T17:42:48+5:30

आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून शिवराज मोरे यांचा सत्कार

Son of municipal employee becomes lieutenant in the army | महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा सैन्यदलात लेफ्टनंट

महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा सैन्यदलात लेफ्टनंट

पिंपरी : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील आरेखक संजीवनी मोरे यांचा मुलगा शिवराज यांची वयाच्या २२ व्या वर्षी सैन्यदलात लेफ्टनंट या पदावर नेमणूक झाली. त्याबद्दल महापालिकेकडून सत्कार करण्यात आला.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील आरेखक संजीवनी प्रदीप मोरे यांचा मुलगा शिवराज यांची वयाच्या २२ व्या वर्षी सैन्यदलात लेफ्टनंट या पदावर नेमणूक झाली. सैन्यदलात रूजू होण्यापूर्वी शिवदीप यांनी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली असता त्याचा सत्कार केला. यावेळी आरेखक संजीवनी मोरे, उप लेखापाल गीता धंगेकर, विजया कांबळे आदी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह यांनी म्हणाले, ‘महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुले-मुली शिक्षण, कला, संशोधन, क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपले स्थान निर्माण करीत आहेत.’

शिवराज प्रदीप मोरे यांचा जन्म ११ मे २००२ रोजी राशीन, जिल्हा अहमदनगर येथे झाला असून, ते नवी सांगवी येथे वास्तव्य करतात. त्यांचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय गणेशखिंड औंध, पुणे येथे झालेले आहे. त्यांचे वडील महाराष्ट्र शासन, पुणे मध्ये क्रीडा अधिकारी असल्यामुळे त्यांना अभ्यासाबरोबरच खेळाचे मार्गदर्शनही घरातून मिळाले. शालेय जीवनात लाॅन टेनिस या खेळात शिवराज यांनी सहा वेळा राष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य मिळविले आहे.

सुवर्णपदकांसह विविध पुरस्कार

शिवराज मोरे यांनी १२ वी नंतर टेक्निकल इन्ट्री स्कीमद्वारे होणारी परीक्षा बंगलोर येथून दिली असून, त्यामध्ये ते पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी पुढील प्रशिक्षण बिहार राज्यातील गया येथे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी येथून घेतले आहे. तिथे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग फेज वन वर्ष पूर्ण केले असून, ते फेज टू करिता कॅडेटस ट्रेनिंग विंगकरिता सिकंदराबाद येथील मिलिटरी काॅलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड मेकॅनिकल इंजिनिअरिंग या संस्थेत दाखल झाले असून, त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधून बी टेक पदवी घेतली आहे. शिवराज यांना प्रशिक्षणादरम्यान सुवर्णपदकांसह विविध पुरस्कार मिळाले.

Web Title: Son of municipal employee becomes lieutenant in the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.