Pimpri Chinchwad: मुलाने डोक्यात दांडके घालून आईलाच ठार मारले; कौटुंबिक कारणातून प्रकार
By प्रकाश गायकर | Updated: November 17, 2023 13:23 IST2023-11-17T13:21:32+5:302023-11-17T13:23:02+5:30
पोलिसांनी याप्रकरणी संशयित मुलाला अटक केली आहे....

Pimpri Chinchwad: मुलाने डोक्यात दांडके घालून आईलाच ठार मारले; कौटुंबिक कारणातून प्रकार
पिंपरी : कौटुंबिक कारणातून डोक्यात लाकडी दांडके घालून मुलाने आईचा खून केला. ही घटना मंगळवारी (दि. १४) रात्री आठ ते दहाच्या सुमारास मामुर्डी येथील आगरवाल चाळ येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी संशयित मुलाला अटक केली आहे.
कांताबाई अश्रुबा शिंदे (वय ६०) असे मृत आईचे, तर नीलकंठ अश्रूबा शिंदे (४१, रा. अगरवाल चाळ मामुर्डी) असे अटक संशयित मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई मोमीन सुलेमान शेख यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित नीलकंठ शिंदे याने आई कांताबाई शिंदे यांचा कौटुंबिक कारणातून डोक्यात लाकडी दांडके घालून खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.