....म्हणून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून केले आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 02:45 PM2020-10-16T14:45:07+5:302020-10-16T14:47:26+5:30

आयुष्यात आलेल्या अंधाराला न डगमगता आपण पुढे जायला हवे....

.... So Pimpri Police Commissioner Krishna Prakash arrived on stage with a black scale on eye | ....म्हणून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून केले आगमन

....म्हणून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून केले आगमन

googlenewsNext
ठळक मुद्देजागतिक अंध दिनानिमित्त"चलो किसिका सहारा बने" कार्यक्रम

पिंपरी: आयुष्यात आलेल्या अंधाराला न डगमगता आपण पुढे जायला हवे. मोठी स्वप्नं पाहून यशस्वी होता येते. दृष्टी नसली तरीही आपल्याकडे मोठे ध्येय गाठण्याची शक्ती आहे. आपल्या अंतर मनाला जागृत करून विविध क्षेत्रातील संधीचं सोनं करून घ्यायला हवे. अडचणींवर मात करून आपण शिक्षण,खेळ,नोकरीच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल करीत आहात, ही आनंदाची बाब असल्याचे पिंपरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. तसेच विशेष म्हणजे त्यांनी आपल्या डोळ्यांवर काळीपट्टी बांधत कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आगमन केले.    

जागतिक अंध दिवसानिमित समाजातील वंचीत घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी "चलो किसिका सहारा बने" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात करण्यात आले. अंध बांधवांच्या व्यथा,वेदना व गरज याचा विचार करून त्यांना सहानभूती नको,सहकार्य करणे महत्वाचे असल्याचे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.अंतर मनाला जागृत करून आयुष्यात यशाची शिखरे सहज पार करता येतात असा संदेश त्यांनी अंध व्यक्तींना दिला.

'प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाईंड व जितो चिंचवड पिंपरी' यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आयुक्तांनी स्वतः डोळ्यावर काळी पट्टी बांधून कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आगमन केले.पोलीस आयुक्तालयात आज दुपारी हा कार्यक्रम संपन्न झाला.डोळ्यात दाटलेले काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या अंध बंधवांना मार्ग दाखविणाऱ्या पांढऱ्या काठीचे वाटप आयुक्तांच्या हस्ते अंध विद्यार्थ्यांना करण्यात आले.
आधुनिक युगात तंत्र ज्ञानाचा वापर करुन या व्यक्ती आपले अस्तित्व कशा प्रकारे दाखवीत आहेत या बाबत ऑन लाईन पद्धतीने प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.अंध शिक्षक व प्रशिक्षक सतीश नवले यांनी ऑन लाईन द्वारे आयुक्तांशी संपर्क साधत अंध व्यक्तींच्या शिक्षण,रोजगार व इतर कार्यक्रमाची माहिती दिली.
समाजच्या मुख्य प्रवाहात अंध बांधवांना सामावुन घेण्यासाठी समाजातील डोळस व्यक्तींनी पुढे यायला हवे अशा भावना व्यक्त केल्या.या प्रसंगी प्रेरणा परिवाराचे अध्यक्ष पराग कुंकुलोळ जितो अध्यक्ष संतोष धोका यांच्यासह संस्थेचे सहकारी व अंध विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी आपल्या अनोख्या शैलीत अंध बांधवांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी अंध विद्यार्थी संतोष राऊत,तुप्ती कर्णावट, पूनम बंब,सुस्मिता कन्हेरी,नेमीचंद ठोले, विश्वास काशीद,अर्चना चोरडिया,सचिन साकोरे, उमेश भंडारी,मनीष ओस्तवाल यांच्या सह संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी योगदान दिले.
--------------
आयुक्तांनी डोळ्यावर बांधली काळी पट्टी
आज जागतिक अंध दिवस असल्याने अंध बांधवांच्या व्यथा,वेदना व गरजा लक्षात याव्यात व समाजाला त्यांच्याविषयीची माहिती व्हावी हा संदेश देण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः डोळ्यावर काळी पट्टी बांधून व्यासपीठावर आगमन केले.यावेळी उपस्थित सर्व अंध विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.

Web Title: .... So Pimpri Police Commissioner Krishna Prakash arrived on stage with a black scale on eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.