शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

पिंपरीतील क्रीडा विभागाच्या कार्यालयात आढळला साप, कर्मचाऱ्यांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 2:10 PM

क्रीडा ग्रंथालय व माहिती केंद्रात गुरूवारी सकाळी कार्यालयात घोणस जातीचा साप आढळल्याने कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

पिंपरी : नेहरूनगरजवळील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील क्रीडा ग्रंथालय व माहिती केंद्रात गुरूवारी सकाळी कार्यालयात घोणस जातीचा साप आढळल्याने कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तसेच कागदपत्रांचा ढिगारा, कार्यालयातील वस्तुंची अडचण त्यामुळे सापाचा शोध घेणे अवघड जात होते. त्यानंतर सर्पमित्रांना बोलावण्यात आले त्याने घोणस जातीचा साप पकडला.   गुरुवारी सकाळी खिडकीतून एक साप बाहेर आल्याचे रखवालदाराने पाहिले होते, त्याने फुस्स फुस्स आवाज सापाचा असल्याचे सांगितले. सकाळी कामावर आलेले कर्मचारी कोणीही कार्यालयात जाऊन बसण्याचे धाडस करेना.घोणस जातीच्या सापाने पिल्ले दिली असल्याची शक्यता सर्पमित्रांनी व्यक्त केली.सापाचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. काही कर्मचाऱ्यांनी आवाजाच्या दिशेने कोठे साप दिसतो आहे, का हे पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार असल्याने त्यांना काही दिसत नव्हते, आवाज मात्र ऐकू येत होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांना बोलावले, त्यांनी साप पकडला . त्यानंतर दुपारी १२ वाजता कर्मचारी आपापल्या खुर्चीत बसले. घोणस जातीचा साप सर्पमित्र राहुल यांनी प्रशांत काळे, सतिश सुर्यवंशी यांच्या मदतीने पकडला. घोणसने पिल्ले दिली असल्याची शक्यता आहे. घोणस एका वेळी किमान चार ते पाच अथवा त्यापेक्षा अधिक पिल्लांना जन्म देऊ शकते. त्यामुळे घोणस या विषारी जातीच्या सापाची आणखी पिल्ले असू शकतात. अशी शक्यता सर्पमित्रांनी व्यक्त केली असून क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.         

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे