सहावेळा त्याला घरच्यांनी आत्महत्येपासून राेखले मात्र...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 12:56 IST2019-09-11T12:53:39+5:302019-09-11T12:56:27+5:30
राहत्या घरी गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली आहे.

सहावेळा त्याला घरच्यांनी आत्महत्येपासून राेखले मात्र...
पिंपरी : राहत्या घरात गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केली. ही घटना चिंचवडमधील रामनगर परिसरात मंगळवारी (दि. १०) दुपारी घडली. सचिन सुरेश पाटकर (वय ३५, रा. सहजीवन कंपनीसमोर, रामनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन हे अविवाहित होते. तसेच त्यांना दारूचे व्यसन होते. यापूर्वी त्यांनी सहा वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रत्येकवेळी त्यांच्या घरच्यांनी त्यांना वाचविले होते. मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास सचिन यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने पंख्याच्या हुकाला गळफास घेतला. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरीत सचिन यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.