शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघात सहा ‘सखी’ मतदान केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 14:33 IST

पिंपरी : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक तालुका किंवा विधानसभा मतदारसंघनिहाय एक मतदान केंद्र महिला व्यवस्थापित करण्यात आले आहे. मावळ ...

ठळक मुद्देनिवडणूक प्रशासनात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश

पिंपरी : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक तालुका किंवा विधानसभा मतदारसंघनिहाय एक मतदान केंद्र महिला व्यवस्थापित करण्यात आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा मतदारसंघांचा समावेश असल्याने मावळमध्येमहिला व्यवसथापित सहा सखी मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. निवडणूक प्रशासनात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. काही महत्त्वाच्या पदांची जबाबदारी महिला अधिकारी सक्षमपणे पार पाडत आहेत. मतदान प्रक्रियेत महिलांनी सहभागी होत मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगातर्फे सातत्याने जनजागृती करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात ज्या मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी सखी बूथ ही संकल्पना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर मावळ लोकसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात एक सखी बूथ तयार करण्यात आले आहे. या केंद्रांवर बूथ लेव्हल अधिकारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच अन्य कर्मचारी म्हणून महिलांचीच नियुक्ती करण्यात येणार आहे. पिंपरी येथील महापालिकेचे विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालयाच्या तळमजल्यावरील खोली क्रमांक ३ मधील मतदान केंद्र क्रमांक ३०४ सखी बूथ असणार आहे. चिंचवड मतदारसंघात थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण महापालिका शाळा क्रमांक ६०/१, पहिला मजल्यावरील खोली क्रमांक १ मधील मतदान केंद्र क्रमांक १७८ सखी बूथ राहणार आहे. विधानसभेच्या मावळ मतदारसंघात कान्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोली क्रमांक १ मधील मतदान केंद्र क्रमांक ११७ सखी बूथ असणार आहे. कर्जत येथील आर. झेड. पी. प्राथमिक मराठी कन्या शाळेतील खोली क्रमांक १ मधील मतदान केंद्र क्रमांक १६६ सखी बूथ आहे. पनवेल येथील विखे पाटील शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ३४४ आणि उरण मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक २२९ सखी बूथ म्हणून तयार करण्यात आले आहे. लोकसभेच्या मावळ मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता व्दिवेदी यांनी याबाबत सांगितले,महिलांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्या मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या जास्त आहे, किंवा इतर मतदान केंद्रांपेक्षा ज्या केंद्रांवरील महिला मतदारांची टक्केवारी जास्त आहे, अशा केंद्रांवर महिला अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले आहेत. जेणे करून जास्तीत जास्त महिलांनी मतदान करावे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmaval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानWomenमहिला