फॅन्सी नंबर प्लेटवाले, सायलंसर बदलून देणारे दुकानदार पिंपरी वाहतूक पोलिसांच्या 'रडार'वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 11:18 AM2020-10-30T11:18:06+5:302020-10-30T11:18:20+5:30

वाहनांमध्ये विनापरवाना बदल केल्यास कारवाई

Shopkeepers with fancy number plates, changing silencers on the 'target 'of Pimpri traffic police | फॅन्सी नंबर प्लेटवाले, सायलंसर बदलून देणारे दुकानदार पिंपरी वाहतूक पोलिसांच्या 'रडार'वर 

फॅन्सी नंबर प्लेटवाले, सायलंसर बदलून देणारे दुकानदार पिंपरी वाहतूक पोलिसांच्या 'रडार'वर 

Next
ठळक मुद्देविनापरवाना वाहनांमध्ये बदल करणे कायद्याने गुन्हा

पिंपरी : विनापरवाना वाहनांमध्ये बदल करणे कायद्याने गुन्हा आहे. फॅन्सी नंबर प्लेटमुळे पोलिसांना कारवाई करताना अनेक अडचणी येतात. तसेच सायलंसर बदलल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.  त्यामुळे आता अशा दुचाकीस्वारांसह आता दुकानदारांवर देखील वाहतूक पोलिसांकडून कारवाई होणार आहे.

मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ५२ नुसार वाहनांमध्ये विना परवानगी फेरबदल करणे, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नियम ५०, ५१ अन्वये वाहनाची नंबर प्लेट बदलणे गुन्हा असल्याचे सांगण्यात आले आहे. या नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. बनावट नंबर प्लेट किंवा फॅन्सी नंबर प्लेट वाहनांना बसवून गुन्हेगार त्यांचा गुन्ह्यामध्ये वापर करतात. त्यामुळे अशी वाहने व आरोपी तात्काळ मिळून येत नाहीत. त्याचप्रमाणे नंबर प्लेटचा बोध न झाल्याने मोटार वाहन कायद्यानुसार करण्यात येणाऱ्या कारवाईत व्यत्यय येतो.

दुचाकी वाहनांच्या सायलंसरमध्ये (विशेषतः बुलेट सायलेन्सर) बदल करून सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांसारखा आवाज करून नागरिकांचे स्वास्थ्य बिघडवले जाते. यामुळे वाहतुकीच्या नियमांचेही उल्लंघन केले जाते.

शहरातील वाहन चालक वाहनामध्ये विनापरवाना फेरबदल करीत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.

मोटार वाहन नियमामध्ये नमूद केल्याप्रमाणेच व निकषांनुसार नंबर प्लेट बनवावी. फॅन्सी नंबर प्लेट बनवू नये. नंबरप्लेट बनवतेवेळी संबंधीत वाहनाचे कागदपत्र अथवा आरसी बुकची छायांकीत प्रत संग्रही ठेवावी. व यासाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवून त्यामध्ये नंबर प्लेट नुसार वाहनांच्या नोंदी ठेवाव्यात, अशा सूचना आणि आवाहन सर्व नंबर प्लेट बनविणाऱ्या दुकानदारांना वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दुचाकी गॅरेजचे चालक व मालक यांनी परिवहन विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही दुचाकी वाहनाच्या मूळ साच्यामध्ये फेरबदल कररू नयेत. विशेषतः बुलेट सायलंसर बदलून देऊ नयेत. वाहनामध्ये बेकायदेशीर फेरबदल केल्यास तसेच खऱ्या नंबरप्लेट ऐवजी फॅन्सी नंबर प्लेट बवनवून दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत आस्थापनेवर आणि आस्थापना चालक व मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Shopkeepers with fancy number plates, changing silencers on the 'target 'of Pimpri traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.