शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

मतदानानंतर वारजे येथे गोळीबार करणारा जाळ्यात; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सराईतास ठोकल्या बेड्या

By नारायण बडगुजर | Updated: May 9, 2024 18:45 IST

गोळीबार झालेले ठिकाण मतदान केंद्रापासून दूर अंतरावर असल्याने मतदान प्रक्रियेशी या घटनेचा काहीही संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.

पिंपरी : मतदान संपल्यानंतर वारजे परिसरात दहशत पसरविण्यासाठी गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी येथे अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले. पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने बुधवारी (दि. ८) रात्री ही कारवाई केली.

सिद्धप्पा येळसंगेकर (३५, रा. येळसंगी, ता. आळंद जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गोळीबार प्रकरणी पोलिस अंमलदार हेमकांत पवार यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

वारजे येथील काही भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. मंगळवारी (दि. ७) या भागात मतदान झाल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास वारजे परिसरात तिघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी हवेत गोळीबार केला. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. गोळीबार केल्यानंतर तिघेजण कात्रजच्या दिशेने पळून गेले. पुणे पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. मात्र त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला. गोळीबार झालेले ठिकाण मतदान केंद्रापासून दूर अंतरावर होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेशी या घटनेचा काहीही संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.   दरम्यान, बुधवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात एकजण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सिद्धप्पा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले. गोळीबार केल्याचे सिद्धप्पाने पोलिसांना सांगितले. त्याने त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांसोबत मिळून वारजे येथे गोळीबार केला. त्यानंतर सिद्धप्पा हा लपण्यासाठी पिंपरी परिसरात आला. बुधवारी रात्री पिंपरीतील एका ठिकाणी तो लपून दारू पीत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.  

गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक गणेश माने, शिवानंद स्वामी, दिलीप चौधरी, संतोष इंगळे, सागर अवसरे, नामदेव कापसे, आतिष कुडके, देवा राऊत, अजित सानप, शिवाजी मुंढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

खून प्रकरणी दोन गुन्हे दाखल

सिद्धप्पा याच्यावर खूनप्रकरणी गुलबर्गा जिल्ह्यातील येळसंगी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पिस्तूल बाळगल्या प्रकरणी सिद्धप्पा याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकSocialसामाजिक