शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ब्लाऊजने गळा आवळत सुनेने केला सासूचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 21:00 IST

तळेगाव दाभाडे येथील घटना

ठळक मुद्देचार दिवस मृतदेह पोत्यात बांधून ठेवला गच्चीवर

पिंपरी: सासू-सुनेच्या भांडणामध्ये सूनेने सासूचा ब्लाउजच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह गोनीत बांधून चार दिवस टेरेसवर ठेवला त्यातून वास यायला लागल्यानंतर तीने पतीच्या मदतीने मृतदेह झुडपात टाकून दिला. ही विदारक घटना तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी घडली आणि रविवारी उघडकीस आली.

बेबी गौतम शिंदे (वय ५०), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर  पूजा मिलींद शिंदे (वय २२), मिलींद गौतम शिंदे (वय २९) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सून व मुलाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबी आणि त्यांची सून पूजा यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. भांडण झाल्यानंतर सासू सुनेच्या भांडणामध्ये सासूने सुनेला व नातवाला मारहाण केली. या रागातून सुनेने ब्लाउजच्या साहाय्याने सासूचा गळा आवळून खून केला. त्यांचा मृतदेह पोत्यात बांधून झुडपात टाकून दिला. याप्रकरणी सुनेसह तिच्या पतीला अटक केली आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे रविवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. 

बेबी गौतम शिंदे (वय ५०), असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. पूजा मिलींद शिंदे (वय २२), मिलींद गौतम शिंदे (वय २९), असे अटक केलेल्या आरोपी पत्नी व पतीचे नाव आहे. अमित गौतम शिंदे (वय २२, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली. याप्रकरणी अमित गौतम शिंदे (वय २२, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली.

अमित शिंदे हे त्यांची आई बेबी, भाऊ मिलिंद, वहिनी पूजा तसेच पुतण्या आयुष यांच्यासोबत राहतात. अमित यांची आई बेबी व वहिनी पूजा यांचे घरगुती कारणावरून वाद होत असत. वाद झाल्यानंतर बेबी दोन-दोन दिवस घरातून निघून जात असत. राग शांत झाल्यानंतर त्या परत घरी येत असत. शुक्रवारी बेबी आणि पूजा यांच्यात पुन्हा वाद झाला होता. त्यावेळी पूजा हिने जुन्या ब्लाउजने बेबी यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह एका गोणीत भरून इमारतीच्या टेरेसवर ठेवून दिला. सायंकाळी अमित कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी आईबद्दल विचारणा केली त्यावेळी त्यांच्याशी भांडण झाल्याने त्या पुन्हा घर सोडून गेल्या असल्याचे पूजा यांनी सांगितले. दरम्यान त्यांच्या शेजारच्यांनी टेरेसवरून घाण वास येत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे तीन दिवसांनी पूजा हिने तिचा पती मिलिंद याच्यासह मिळून गोणीत बांधलेला मृतदेह जिन्यातून फरफटत खाली आणला व मोकळ्या जागेतील झुडपात टाकला. संपूर्ण जीना घाण झाल्यामुळे दोघांनी जीना धूण्यास सुरवात केली त्याच दरम्यान अमित तेथे आले तुम्ही बिल्डिंगच्या पायऱ्या का धूत आहे, असे अमित यांनी विचारले. त्यावेळी पूजाने घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे अमित याने लागलीच पोलिसांत धाव घेतली व दोघांविरुध्द तक्रार केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक