शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! प्रेयसीच्या बाजूला बसल्याच्या रागात मित्रानेच केली मित्राची हत्या, पिंपरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 14:31 IST

प्रेयसीच्या बाजूला जाऊन बसल्याच्या रागात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. आदित्य सुनील जैद असं मयत मुलाचं नाव आहे.

चिंचवड, दि. 12 - प्रेयसीच्या बाजूला जाऊन बसल्याच्या रागात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. आदित्य सुनील जैद असं मयत मुलाचं नाव आहे. आरोपी तरुणाने मारहाण आदित्य सुनील जैदला करण्यासाठी आपल्या काही मित्रांना बोलावलं होतं. या सर्वांनी मिळून आदित्य सुनील जैदला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मृत पावलेला आदित्य सुनील जैद एका महिला पोलीस कर्मचा-याचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. एवढ्याशा क्षुल्लक कारणावरुन तरुणाला मारहाण करत हत्या केल्याने शहरात खळबळ माजली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य सुनील जैद हा आरोपीच्या मैत्रीणीसोबत बसला होता. आपल्या मैत्रीणीच्या बाजूला आदित्य बसला आहे याचा आरोपी तरुणाला प्रचंड राग आला होता. या रागातून त्याने आपल्या काही मित्रांना मारहाण करण्यासाठी बोलावलं होतं. आरोपी तरुणाने आपल्या मित्रांसोबत आदित्यला महाविद्यालयाजवळून जीपमध्ये बसवून एका ठिकाणी नेलं. त्यानंतर त्याला बॅटने बेदम मारहाण करण्यात आली. 

आरोपी तरुणांनी केलेल्या बेदम मारहाणीत आदित्य गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला भोसरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र बेदम मारहाणीमुळे आदित्य सुनील जैदचा रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच मृत्यू झाला होता. आदित्य सुनील जैदचा मृत्यू झाल्याने आपण अडचणीत सापडणार असल्याचं लक्षात येताच तरुणांनी रुग्णालयामधून पळ काढला. यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.  

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिसPuneपुणे