शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीतील धक्कादायक घटना! पाच जणांनी मिळून केले एकावर तलवारीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 14:37 IST

पाच जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्याचा राग मनात धरून केला हा प्रकार

पिंपरी: भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रागातून पाच जणांनी मिळून एकावर कोयते आणि तलवारीने वार केले. फावड्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी पाटीलनगर, चिखली येथे ही घटमना घडली.

सचिन नितीन गायकवाड, सुरज खपाले, ऋतिक उर्फ मुंग्या रोकडे, विशाल शिंदे, भीमा अशोक कांबळे (सर्व रा. चिखली गाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मारुती बाजीराव मोरे (वय ४२ , रा. पाटीलनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास विष्णू मोरे असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सचिन गायकवाड आणि मारुती मोरे यांचे नातेवाईक गणेश मोरे व अमोल मोरे यांचे भांडण झाले. त्यावेळी मारुती मोरे यांचा पुतण्या विकास मोरे हा भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडला होता. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. विकास मोरे सोमवारी दुपारी साडे पाच वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ असलेल्या बाकड्यावर बसला होता. त्यावेळी आरोपी तिथे आले.

सुरज खपाले याने माझ्या गँग मधील मेंबरला नडतो का, असे म्हटले. त्यानंतर बेकायदेशीरपणे जमाव जमवून तलवारी, कोयते दाखवून दहशत माजवली. तसेच विकास मोरे याच्यावर तलवार आणि कोयत्याने वार केले. त्यानंतर फावड्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू