धक्कादायक! पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छतागृहात बाळाला जन्म देऊन रिक्षात टाकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 19:55 IST2021-02-27T19:54:44+5:302021-02-27T19:55:16+5:30

बाळाला आपणच जन्म देऊन रिक्षात टाकून दिले, असे महिलेने पोलिसांना सांगितले.

Shocking! gave birth to a baby in the toilet of Chinchwad Municipal Corporation and put it in a rickshaw | धक्कादायक! पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छतागृहात बाळाला जन्म देऊन रिक्षात टाकले 

धक्कादायक! पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छतागृहात बाळाला जन्म देऊन रिक्षात टाकले 

पिंपरी : महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात रात्री बाळाला जन्म देऊन त्या नवजात अर्भकाला एका रिक्षात टाकून दिल्याचा प्रकार घडला. मोरवाडी येथे शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. संबंधित महिलेचा पोलिसांनी शोध घेतला असून, बाळाला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडी येथे रिक्षात एक पुरुष जातीचे नवजात अर्भक कोणीतरी टाकून दिले असल्याचे शनिवारी सकाळी सात ते आठच्या दरम्यान काही नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अर्भकाला ताब्यात घेऊन वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोरवाडी परिसरात पोलिसांनी तपास केला. एक महिला गरोदर होती, अशी माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी कसून शोध घेत संबंधित महिलेला चाैकशीसाठी ताब्यात घेतले. बाळाला आपणच जन्म देऊन रिक्षात टाकून दिले, असे महिलेने पोलिसांना सांगितले. हा प्रकार नेमका का केला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Web Title: Shocking! gave birth to a baby in the toilet of Chinchwad Municipal Corporation and put it in a rickshaw