शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

पिंपरीत येथील'अ' क्षेत्रीय कार्यालयावर शिवसेनेचा '' हंडा मोर्चा ''

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 4:30 PM

'पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे', 'पाणी गळती थांबलीच पाहिजे' असा जोरदार घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला. 

पिंपरी - 'निगडी प्राधिकरणातील पाणीपुरवठा सुरळीत झालाच पाहिजे', 'पाणी कपात रद्द झालीच पाहिजे', 'शहरवासियांना शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे', 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे', 'पाणी गळती थांबलीच पाहिजे' असा जोरदार घोषणा देत शिवसेनेच्या वतीने आज गुरुवारी 'अ' क्षेत्रीय कार्यालयावर 'हंडा मोर्चा' काढण्यात आला.  शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बाळासाहेब वाल्हेकर, उपशहरप्रमुख अमोल निकम, पिंपरी विधानसभेच्या महिला संघटिका सरिता साने, समन्वयक भाविक देशमुख, विभागप्रमुख पार्थ गुरव, उपविभागप्रमुख विकास भिसे, महेश जाधव, शाखाप्रमुख शरद जगदाळे, दिपक कोटकर, त्रिभुवन मुल्ला, युवा अधिकारी  सागर पांढारकर, निलेश जांभळे, सचिन नागपुरे, अनुजा कुमार यांच्यासह शिवसैनिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'अ' क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दिपक कुंभार यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. नगरसेवक अमित गावडे म्हणाले, "पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे. तरीदेखील शहरवासियांना मुबलक आणि पुरेसे पाणी मिळत नाही. प्रभाग क्रमांक 15 मधील सेक्टर नंबर 24 ते 28 , निगडी, प्राधिकरण, निगडी गावठाण या परिसरातील पाणी प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. प्राधिकरणातील नागरिकांना पुरेसे पाणी देखील मिळत नाही"याबाबत सातत्याने तक्रार करुन देखील त्याची दखल घेतली जात नाही. काही भागातील पाण्याच्या लाईन 'लिकेज' होत आहेत. त्यामुळे चेंबरमधील गढूळ पाणी मिसळत आहे. नागरिकांना दुषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत असून साथीचे आजार पसरण्याची भीती आहे", असेही ते म्हणाले.प्राधिकरणातील पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत करण्यात यावा. तक्रारींचे निराकरण करावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावडे यांनी दिला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीShiv Senaशिवसेना