शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजप युती ही काळाची गरज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 22:20 IST

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दोन -अडीच वर्षे सगळेच दबकून बसले होते. मात्र, आम्ही सर्व निर्बंध हटविल्याने सगळं मोठ्या उत्साहात सुरू झाले.

पिंपरी : जगात कोठेही कोरोना वाढला की त्याचा परिणाम महाराष्ट्रावर व्हायचा. मात्र, आम्ही आलो आणि सर्व निर्बंध हटविले. जे २०१९ मध्ये व्हायला पाहिजे होते ते आम्ही सहा महिन्यांपूर्वी केले. शिवसेना -भाजप युती ही काळाची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. भोसरी येथे इंद्रायणी थडी जत्रेचा रविवारी (दि. २९) समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दोन -अडीच वर्षे सगळेच दबकून बसले होते. मात्र, आम्ही सर्व निर्बंध हटविल्याने सगळं मोठ्या उत्साहात सुरू झाले. त्यापूर्वी इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, असे होते. मात्र, आता चिंता करू नका. तुमच्या केसालाही हात लावण्याची कोणी हिम्मत करणार नाही. राज्यातील हे डबल इंजिजनच सरकार वेगाने धावतंय. या सहा महिन्यांत सर्व घटकांसाठी निर्णय घेण्याचा आम्ही धडाका लावला आहे. कमी वेळात आम्हाला जास्त काम करायचे आहे. या सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट करणार आहे. 

भोसरीला पैलवानांचा इतिहास -पैलवान काहीही करून शकतात. भोसरीला पैलवानांचा इतिहास आहे. पैलवान महेश लांडगे हे उमेदवारी मिळावी म्हणून माझ्याकडे आले होते. त्यावेळी मी पक्षाकडे शब्द टाकला होता. मात्र, त्यांना माणसांची पारखच नव्हती, असे म्हणून नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या