थेरगावमध्ये पोलिसाला धक्काबुक्की करून फाडला शर्ट; तडीपार आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 04:58 PM2021-03-23T16:58:41+5:302021-03-23T17:00:44+5:30

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपीला २ जुलै २०१९ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

Shirt torn of police in Thergaon; Tadipar accused was arrested arrested | थेरगावमध्ये पोलिसाला धक्काबुक्की करून फाडला शर्ट; तडीपार आरोपीला अटक

थेरगावमध्ये पोलिसाला धक्काबुक्की करून फाडला शर्ट; तडीपार आरोपीला अटक

Next

पिंपरी : तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी आरोपीने हुज्जत घातली. धक्काबुक्की करून आरोपीने पोलिसाचा शर्ट फाडला. थेरगाव येथे सोमवारी (दि. २२) हा प्रकार घडला.

बबल्या उर्फ सागर बापू खताळ (वय २२, रा. थेरगाव), असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस नाईक पी. डी. कदम यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २ जुलै २०१९ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी शासनाची कोणतीही परवानगी घेता आरोपी पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. आरोपी हा १६ नंबर, थेरगाव येथे थांबला असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस गेले. त्यावेळी आरोपीने पोलीस नाईक कदम यांच्यासोबत हुज्जत घातली. कदम यांना धक्काबुक्की करून त्यांचा शर्ट फाडून सरकारी कामात आरोपीने अडथळा निर्माण केला.

Web Title: Shirt torn of police in Thergaon; Tadipar accused was arrested arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.