Pimpri Chinchwad: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ सुरूच, जयंत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश
By प्रकाश गायकर | Updated: October 19, 2023 16:00 IST2023-10-19T15:59:21+5:302023-10-19T16:00:22+5:30
चिंचवडचे माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे यांचे पुत्र उद्योजक सागर चिंचवडे यांनी नुकताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला...

Pimpri Chinchwad: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ सुरूच, जयंत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश
पिंपरी : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी शरद पवार गटाने कंबर कसली आहे. शहरातील तरुणाईला पक्षामध्ये संधी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या गटामध्ये राजकीय क्षेत्रातील तरुणांचे प्रवेश सुरू झाले आहेत. चिंचवडचे माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे यांचे पुत्र उद्योजक सागर चिंचवडे यांनी नुकताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यावेळी ॲड. दिनेश भोईर, ऋतूज चिंचवडे, प्रवीण चोरडिया, प्रकाश धस यांनीही प्रवेश केला. याप्रसंगी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पिंपरी-चिंचवडचे युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिला आघाडी अध्यक्षा ज्योती निंबाळकर, प्रवक्ते रविकांत वरपे, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत-धर, गणेश भोंडवे, काशिनाथ जगताप उपस्थित होते. महापालिकेच्या मागील निवडणुकीत चिंचवडे यांच्या पत्नीने शिवसेनेकडून निवडणूक लढवून तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.