शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गा टेकडीवर नेऊन १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडकीस

By प्रकाश गायकर | Updated: August 30, 2024 15:47 IST

आरोपीने मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली होती

पिंपरी : निगडी मधील दुर्गा टेकडीवर नेऊन १५ वर्षीय मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केला. यासाठी पिडीत मुलीच्या १५ वर्षीय मैत्रिणीने संशयित आरोपीला मदत केली. घडल्या प्रकरणाची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने मुलीने कोणास काही सांगितले नाही. मात्र पिडीत मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. ही घटना ५ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत घडली.

याप्रकरणी पिडीत १५ वर्षीय तरुणीच्या ३५ वर्षीय आईने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सलीम (वय २२ ते २५ वर्ष, रा. ओटास्कीम, निगडी) आणि १५ वर्षीय मुलीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचारासह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी घरात एकटी असताना तिच्यावर अत्याचार करण्याच्या उद्देशाने ‘तू माझ्यासोबत दुर्गा टेकडी येथे चल. नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारून कुटुंब संपवून टाकीन’ अशी सलीम याने धमकी दिली. तिला बळजबरीने दुर्गा टेकडी येथे नेले. तिथे काही अंतरावर पिडीत मुलीची १५ वर्षीय वर्ग मैत्रीण थांबली. सलीम याने मुलीवर तीन वेळा लैंगिक अत्याचार केला. १५ वर्षीय वर्ग मैत्रिणीने पिडीत मुलीला यासाठी भाग पाडले. सलीम याने पिडीत मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाMolestationविनयभंगPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी