सावत्र मुलाविरोधात पत्नीची तक्रार, पतीकडून जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 17:50 IST2022-03-02T17:33:51+5:302022-03-02T17:50:20+5:30

५ वर्षीय पती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल...

sexual abuse of a woman by filing a complaint against her step son | सावत्र मुलाविरोधात पत्नीची तक्रार, पतीकडून जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

सावत्र मुलाविरोधात पत्नीची तक्रार, पतीकडून जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

पिंपरी : सावत्र मुलाने विनयभंग केल्याप्रकरणी महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. त्या रागातून त्या महिलेच्या पतीने तिचा छळ केला. तसेच तिच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्रिवेणीनगर, तळवडे येथे २५ डिसेंबर २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडली.

याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिच्या ४५ वर्षीय पती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने तिच्या सावत्र मुलाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार सावत्र मुलाच्या विरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा राग पीडित फिर्यादी महिलेच्या पतीच्या मनात होता. त्या कारणावरून तसेच घरगुती कारणावरून फिर्यादी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार  केला, असे फिर्यादीत नमूद आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गुमाणे तपास करीत आहेत.

Web Title: sexual abuse of a woman by filing a complaint against her step son