शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

धक्कादायक! पत्नी नांदत नसलेल्या तरुणाकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

By नारायण बडगुजर | Updated: July 19, 2022 17:50 IST

पत्नी चार वर्षांपासून नांदत नसल्याचे पोलीस चौकशीत समोर...

पिंपरी : चाॅकलेटचे आमिष दाखवून सात वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला. थेरगाव येथे रविवारी (दि. १७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. वाकड पोलिसांच्या तपास पथकाने ७० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून १६ तासात आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या. आरोपी हा त्याच्या आईवडिलांसह राहत असून त्याला एक मुलगा आहे. त्याची पत्नी चार वर्षांपासून नांदत नसल्याचे पोलीस चौकशीत समोर आले.  

अलिम मुसा शेख (वय २७, रा. काळेवाडी, मुळगाव शिरुर ताजमल, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील बापुजीबुवा उद्यानात खेळणाऱ्या सात वर्षांच्या अल्पवयीन मुलास चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तरुण पळून गेला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वाकड पोलिसांच्या तपास पथकाने ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. त्यावरून संशयित तरुणाची ओळख पटवून तो रहात असलेल्या परिसरात सापळा रचला. यात शेख याला ताब्यात घेतले. अधिक तपास करून शेख याला सोमवारी (दि. १८) अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शेख याच्यावर यापूर्वी पिंपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे, संतोष पाटील, सहायक निरीक्षक संभाजी जाधव, उपनिरीक्षक अवधूत शिंगारे, पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, वंदु गिरे, दीपक साबळे, स्वप्नील खेतले, बंडु खाडे, अतिश जाधव, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अतिक शेख, प्रशांत गिलबीले, तात्यासाहेब शिंदे, भास्कर भारती व अजय फल्ले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.  

चार वर्षांपासून पत्नी राहते वेगळी

अलिम शेख हा मिळेल ते काम करतो. त्याला एक लहान मुलगा आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून त्याची पत्नी नांदत नसून, अलिम शेख हा त्याच्या आईवडिलांसोबत रहात आहे. तसेच तो व्यसनांच्या आहारी गेल्याचेही तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwakadवाकडThergaonथेरगाव