तळेगाव दाभाडे : सतरा वर्षीय तरुणाने घरातील पंख्याच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. श्रेयस राजू शहरकर ( वय 17, रा. अंबिका काॅर्नर, लक्ष्मीबाग कॉलनी,तळेगाव दाभाडे,ता.मावळ,जि.पुणे) असे आत्महत्या केलेल्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. श्रेयसने किचन मधील फॅनच्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार आज दुपारी 3.45 च्या सुमारास उघडकीस आला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस इंद्रायणी महाविद्यालयात विज्ञान शाखेला ११ वीमध्ये शिकत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.प्रवीण कानडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे करीत आहेत.
सतरा वर्षीय तरुणाची आत्महत्या ; कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 20:14 IST