शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

सात दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता

By admin | Updated: September 13, 2016 00:57 IST

मासूळकर कॉलनी परिसरातील गणेश मंडळांनी ढोल -ताशांच्या गजरात तर संत तुकारामनगरमध्ये डीजेच्या दणदणाटामध्ये आकर्षक सजवलेल्या रथांमधून

नेहरुनगर : मासूळकर कॉलनी परिसरातील गणेश मंडळांनी ढोल -ताशांच्या गजरात तर संत तुकारामनगरमध्ये डीजेच्या दणदणाटामध्ये आकर्षक सजवलेल्या रथांमधून सातव्या दिवशी मिरवणुका काढून रात्री बारा वाजता गणेशाचे पिंपरी घाटावर विसर्जन केले.मासूळकर कॉलनी येथील लोकमान्य युवक तरुण मित्र मंडळाच्या वतीने ढोल- ताशांच्या गजरात फुलांची आकर्षक सजावट करून तयार केलेल्या मेघडंबरीच्या आकर्षक रथावरून गणपती बाप्पाची मिरवणूक काढली होती. मिरवणुकीमधील ढोल-ताशांच्या आवाजामुळे परिसर दणदणून गेला होता. ही परिसरातील लक्षवेधी मिरवणूक होती. मिरवणुकीचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष क्रीडा सभापती समीर मासूळकर यांनी केले होते.एकता मित्र मंडळाच्या वतीने आकर्षक सजावट केलेल्या रथावरून गणपतीची मूर्तीची ढोल -ताशांच्या गजरात मिरवणूक काढली होती. मिरणुकीतील रथ नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. मिरवणुकीचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष कौशल रावल आदींनी केले होते.शिवप्रेमी तरुण मित्र मंडळाच्या वतीने ढ़ोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप दिला. मंडळाचे अध्यक्ष शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अर्जुन ठाकरे यांनी नियोजन केले होते. छत्रपती शिवाजी मित्र मंडळाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात आकर्षक सजावट विद्युत रोषणाई केलेल्या रथातून गणरायाची मिरवणूक काढली. मिरवणुकीचे आयोजन अध्यक्ष आशिष पाटील आदींनी केले होते.उद्यमनगर मित्र मंडळाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात फुलांची सजावट केलेल्या आकर्षक रथावरून गणपती बाप्पाची मिरवणूक काढली होती. मिरवणुकीचे आयोजन अध्यक्ष हेमंत शिर्के यांनी केले होते.संत तुकारामनगर येथील उत्कर्ष मित्र मंडळाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात आकर्षक गजरथातून गणपती बाप्पाची मिरवणूक काढली होती. मिरवणुकीमधील गजरथ नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. मिरवणुकीमध्ये वारकऱ्यांच्या वेशभूषेत चिमुकले मुले सहभागी झाली होती. तसेच तलवारबाजीचे प्रात्यक्षिकेदेखील सादर करण्यात आली होती. सुवर्णयुग मित्र मंडळ जागृती कला क्रीड़ा केंद्र, संघर्ष मित्र मंडळ, दिगंबरा प्रतिष्ठान या मंडळाच्या वतीने आकर्षक सजवलेल्या रथामधून गणपतीची मिरवणूक डीजेच्या गजरात काढली होती. तरुण डीजेवरील प्रसिद्ध गाण्यावर नृत्य करीत आनंदोत्सव साजरा करीत होते.स्वराज्य मित्र मंडळ, महेशनगर मित्र मंडळ, अक्षय मित्र मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ, श्री गणेश मित्र व चैतन्य मित्र मंडळ, शिवधनुष्य मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, नवयुग मित्र मंडळ आदी मंडळांनी गणपती मूर्तीचे विसर्जन करून बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. (वार्ताहर)४पिंपळे गुरव : सांगवी व नवी सांगवी परिसरातील घरगुती व सार्वजनिक मंडळांनी रविवारी सकाळपासूनच जय्यत तयारी केली होती. परिसरात सातव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात येतोे. सार्वजनिक गणेश मंडळांनी सकाळपासूनच गणेश विसर्जनाची तयारी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्याची लगबग सुरू होती. परिसरातील मंडळांनी पारंपरिक वाद्य आणि डीजेच्या तालावर काढलेल्या मिरवणुकीनंतर जुनी सांगवी येथील विसर्जन घाटावर गणरायाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन केले. ४या मिरवणुकीमध्ये लहान मुलांसह तरुण-तरुणींचा मोठा सहभाग होता. विसर्जन मिरवणुकीमध्ये झांज पथकाच्या तालावर तरुणाईने ताल धरला होता. मिरवणुकीत मोठया उत्साहाने गणेशभक्त सहभागी झाले होते. या मिरवणुकीत जुनी सांगवी येथील बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने काढलेली बालाजी रथातून मिरवणूक गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होती. हर्षल ढोरे यांच्या कार्यकर्त्यामुळे मिरवणुकीची शिस्तबद्धता होती. शितोळनगर क्रीडा मित्र मंडळने ढोल पथकाने सर्व गणेशभक्तांचे लक्ष वेधले होते. सिद्धिविनायक सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट अखिल शिवस्मृती मित्र मंडळाने आकर्षक सजविलेल्या रथातून श्रींची मिरवणूक काढली. मंडळाचे संस्थापक बजरंग ढोरे यांनी संयोजन केले. ४सांगवी गावठाणातील राही-माई प्रतिष्ठान व शिव मित्र मंडळाने सूर्यरथातून मिरवणूक काढली. यामध्ये ढोल पथकाचा सहभाग होता. सिझन गु्रप वेलफेअर ट्रस्टचा सांगवीचा राजा नावाने प्रचलित असलेली श्रींची आकर्षक भव्य मूर्ती गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत होती. मधुबन मित्र मंडळाने आकर्षक फुलांनी सजावट करुन मिरवणूक काढली. मधुबन मित्र मंडळाने मयूररथातून मिरवणूक काढली. मंडळाचे अध्यक्ष गणेश ढोरे यांनी शिस्तबद्ध नियोजन केले. गंगानगर येथील गणराज मित्र मंडळाने आकर्षक मिरवणूक काढली. कुंभारवाड्यातील अभिनव तरुण मित्र मंडळ संयुक्त जाणता राजा प्रतिष्ठाणने मिरवणुकीत डीजे सिस्टीमचा वापर केला होता. आनंदनगर मित्र मंडळाने फुलांच्या सजावटीसह घोडागाडीचा देखावा सादर केला होता. ४शितोळेनगर येथील जय माता दि मित्र मंडळ, प्रियदर्शनीनगर मित्र मंडळ, अखिल ममतानगर ममतानगर मित्र मंडळ, पवनानगर मित्र मंडळ, रणझुंजार मित्र मंडळ, जयभवानी मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ आदी मंडळांनी आकर्षक मिरवणूक काढली. ४नवी सांगवीतील जय मल्हार व शिव प्रतिष्ठान मित्र मंडळाने आकर्षक मिरवणूक काढली. ढोल पथकाने गणेश भक्तांची मने जिंकली. समतानगर मित्र मंडळाने फुलांची केलेली सजावट लक्षवेधक होती. मंडळाने रथाला जनजागृतीपर फलक लावले होते. अखिल क्रांती चौक मित्र मंडळ, नवी सांगवी विभागीय मित्र मंडळ, कृष्णाई मित्र मंडळ, चैत्रबन मित्र मंडळ, कीर्तीनगर मित्र मंडळ, वागजाई मित्र मंडळ, बारामती मित्र मंडळ आदी मंडळांनी मोठ्या दिमाखात गणरायांची मिरवणूक काढली. (वार्ताहर)