प्रत्येक गावात बंदोबस्त
By Admin | Updated: August 6, 2015 03:34 IST2015-08-06T03:34:41+5:302015-08-06T03:34:41+5:30
हिंजवडीसह आजूबाजूच्या तसेच पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या सहा ग्रामपंचायतींच्या उमेदवारांच्या भवितव्याच्या फैसला आज होणार असल्याने

प्रत्येक गावात बंदोबस्त
वाकड : हिंजवडीसह आजूबाजूच्या तसेच पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या सहा ग्रामपंचायतींच्या उमेदवारांच्या भवितव्याच्या फैसला आज होणार असल्याने या गावांत आज निकालाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
गुरुवारी सकाळी आठला पिरंगुट येथील सैनिकी शाळेत निकालाची सुरुवात होईल. हा निकाल सहा टप्प्यात जाहीर होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कोणीही गडबड करू नये यासाठी प्रत्येक गावासाठी अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हिंजवडी ठाण्याव्यतिरिक्त २० अन्य ठाण्यांतील पोलीस, स्ट्रायकिंग फोर्स, एसआरपीएफची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. (वार्ताहर)