लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर नोकरानेच केला अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 14:29 IST2019-09-11T14:26:52+5:302019-09-11T14:29:33+5:30
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला गराेदर करुन लग्नास नकार देणाऱ्या नाेकराच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर नोकरानेच केला अत्याचार
पिंपरी : घरी घरकाम करण्यासाठी ठेवलेल्या नोकरानेच लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही घटना जुलै २०१९ ते १० सप्टेंबर २०१९ या कालावधीत भोसरी येथे घडली.
याप्रकरणी, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अमितकुमार सुरेंद्रप्रसाद तत्वा (वय २३,मुळ रा. बक्सार, बिहार) याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमितकुमार हा फिर्यादी यांच्या घरी घरकाम करण्यासाठी होता. त्याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केले. दरम्यान अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजल्यावर लग्नास नकार दिला. त्यामुळे अल्पवयीन मुलीने पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.