"सरकार विकणे हा सर्वांत मोठा घोटाळा, उद्धव ठाकरेंचा विवेक महाराष्ट्राला तारणारा"

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: August 31, 2023 23:34 IST2023-08-31T23:33:07+5:302023-08-31T23:34:04+5:30

सबनीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचा विवेक महाराष्ट्राला तारणार आहे

Selling the government is the biggest scam: Shripal Sabnis | "सरकार विकणे हा सर्वांत मोठा घोटाळा, उद्धव ठाकरेंचा विवेक महाराष्ट्राला तारणारा"

"सरकार विकणे हा सर्वांत मोठा घोटाळा, उद्धव ठाकरेंचा विवेक महाराष्ट्राला तारणारा"

पिंपरी : सरकार विकणे हा सर्वांत मोठा घोटाळा आहे. ही राजकीय वृत्ती वेळीच ठेचली पाहीजे. लोकशाही, संविधान वाचवायचे असेल तर सध्या तरी इंडिया आघाडीला साथ देणे महत्वाचे आहे, असे मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. पिंपरीत उध्दवश्री पुरस्काराचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

सबनीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचा विवेक महाराष्ट्राला तारणार आहे. बाळासाहेब अन प्रबोधनकार ठाकरे यांचा सारांश उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे. नव्या भारताची पेरणी उद्धव ठाकरे करत आहेत. इंडियाची भूमिका सध्या तरी भारताला पोषणकारक आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची भूमिका ही सध्या निर्भय आहे. त्यामुळे ते इंडियाचे नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राची संस्कृती ही खूप चांगली आहे. त्या नासवण्याचे काम कोणी करू नये. मी कोणत्याही पक्षाचा माणूस नाही. मात्र, सध्या उध्दव ठाकरेसारख्या माणसांची राज्याला गरज आहे.

Web Title: Selling the government is the biggest scam: Shripal Sabnis